‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा करा
‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा करा

‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा करा

sakal_logo
By

82287
कुडाळ ः येथे हिंदू जनजागृती समितीच्यावतीने आंदोलन करण्यात आले.

‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा करा

हिंदू जनजागृती समिती; कुडाळमध्ये राष्ट्रीय आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १२ ः ‘लव्ह जिहाद’ विरोधात कठोर कायदा झाला पाहिजे. महाराष्ट्र शासनानेही धर्मांतर विरोधी कठोर कायदे करून ''वक्फ बोर्ड''चा कायदा रहित करावा, या मागण्यांसाठी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलनांतर्गत कुडाळ येथे आंदोलन केले. याविषयीचे निवेदन प्रशासनाला देण्यात येणार आहे.
येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयासमोरील एस. एन. देसाई चौक येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना रणरागिणी शाखेच्या प्राची शिंत्रे यांनी, आज उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगड, गुजरात, ओडिसा या राज्यांत धर्मांतर बंदी कायदा आहे. गोवा राज्यातही हा कायदा होऊ घातला असताना महाराष्ट्रात का नाही, असा प्रश्न उपस्थित केला. महाराष्ट्रातही हा कायदा व्हावा, अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करत असल्याचे जिल्हा समन्वयक हेमंत मणेरीकर यांनी सांगितले. युवा संघटक हर्षद खानविलकर यांनी देशात हिंदू समाज ८० टक्के असूनही मूठभर लोक वर्चस्व गाजवत असल्याबाबत खंत व्यक्त केली. आपल्याकडे धर्म शिक्षणाची सोय नसल्यानेच अशा घटना वाढत चालल्या आहेत. आपण संख्येने अधिक आहोत, अशा भ्रमात हिंदूंनी न राहता संघटित होऊन आंदोलनांच्या माध्यमातून एकत्र येण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. राजेंद्र पाटील यांनी हिंदूंच्या धर्मांतराच्या हिंदूंमध्ये जागृती निर्माण करण्यासाठीच ही आंदोलने आहेत, असे सांगितले. अदिती तवटे यांनी सूत्रसंचालन केले.