चिपळूण-बहादूरशेख नाक्यातील वाहतूक कोंडीचा गुंता सुटेना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण-बहादूरशेख नाक्यातील वाहतूक कोंडीचा गुंता सुटेना
चिपळूण-बहादूरशेख नाक्यातील वाहतूक कोंडीचा गुंता सुटेना

चिपळूण-बहादूरशेख नाक्यातील वाहतूक कोंडीचा गुंता सुटेना

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat१२p२५.jpg-KOP२३L८२२९३
चिपळूण ः शहरातील बहाद्दूरशेख नाका येथील मोरीचे काम रखडल्याने एकेरी मार्ग अनेक महिने बंद ठेवला आहे.
------------

बहादूरशेख नाक्यातील
वाहतूक कोंडीचा गुंता सुटेना
एकेरी मार्गामुळे वाहतूकदार हैराण ; परीक्षेपूर्वी दुहेरी मार्ग सुरू करण्याची मागणी

चिपळूण, ता. १२ : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणा अंतर्गत शहरातील बहाद्दूरशेख नाका येथून उड्डाणपुलाचे काम सुरू असताना दुसरीकडे सर्व्हिस रोडचेही काम चालू आहे. मात्र त्यासाठी या ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू ठेवली आहे. या चौकातील मोरीचे काम लांबल्याने एकेरी मार्गावर दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. तेव्हा या ठिकाणचे काम वेगाने व विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा सुरू होण्यापूर्वी मार्गी लावण्याची मागणी केली जात आहे.
महामार्गावरील लांब पल्ल्याची वाहतूक तसेच शहरातून अंतर्गत वाहतूक मोठ्या प्रमाणात महामार्गावर बहाद्दूरशेखनाका येथून जाते. त्यामुळे येथील महामार्ग नेहमीच गजबजलेला असतो. अशा परिस्थितीत एकच सर्विस रोड असल्याने वाहतूक कोंडी होऊन त्याचा मोठा फटका शालेय विद्यार्थी, बसेस, कंपनी गाड्या, तसेच एसटी वाहतूक आणि लहान वाहनांना बसत आहे. प्रवाशांना व विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे महामार्गाच्या दुसऱ्या बाजूने रखडलेले सर्विस रोडचे काम तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली जात आहे. बहाद्दूरशेखनाका येथील पाईप मोरीचे कामही लांबणीवर पडल्याने ते तातडीने मार्गी लावून लवकरात लवकर रस्ता दोन्ही बाजूंनी खुला करावा, अशी मागणी होत आहे.
महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू असून चिपळूण येथील बहादूरशेख ते युनायटेड इंग्लिश स्कूलपर्यंत थेट उड्डाणपूल होणार आहे. त्यासाठी गर्डर उभारण्याचे काम प्रगतीपथावर असून बहादूरशेखपासून ते शिवाजीनगरपर्यंत हे काम पूर्ण होऊन अंतिम टप्प्यात आले आहे. त्यासाठी आवश्यक ती मशनरी व यंत्रसामुग्री येथे तैनात करण्यात आली आहे. बहादूरशेख ते राधाकृष्ण नगर या दरम्यान महामार्गाच्या दोन्ही बाजूने सर्विस रोड तयार करून वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती. त्यामुळे वाहतूक कोंडी होत नव्हती. वाहतूक व्यवस्थित सुरू होती. परंतु आता गर्डरचे काम अंतिम सुरू असताना फक्त एकाच बाजूने सर्विस रोड तयार करण्यात आला आहे. त्यावरूनच दोन्ही बाजूची वाहतूक केली जात आहे. या ठिकाणी दररोज प्रचंड वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. प्रत्यक्षात शहरांतर्गत येणाऱ्या महामार्गावर चारही बाजूने वाहतूक सुरू असल्याने वाहतूक कोंडीचे प्रकारही सतत घडत आहेत.