खेड-संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड-संक्षिप्त
खेड-संक्षिप्त

खेड-संक्षिप्त

sakal_logo
By

पान ५ साठी, संक्षिप्त)


भरणेत मंगळवारी विविध कार्यक्रम
खेड ः तालुक्यातील भरणे येथील श्री देवी काळकाई मंदिर भक्तनिवासाचा प्रथम वर्धापनदिन १४ फेब्रुवारीला साजरा होणार आहे. या वेळी आयोजित कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन देवस्थान मंडळाने केले आहे. खेड तालुक्यातील भरणे येथील उभारलेल्या भक्तनिवास इमारतीत सकाळी ८ वा. देवीची मिरवणूक, १० वा. रिंगण कार्यक्रम, ११ वा. सत्यनारायण महापूजा, दुपारी १२ वा. देवीची आरती, १२.३० वा. महाप्रसाद, सायं. ६ वा. महाआरती, ६.३० वा. हरिपाठ, ७ वा. कीर्तन, रात्री ९ वा. मनोरंजनात्मक कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमांमध्ये भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष सचिन जाधव, सचिव सुजित शिंदे, खजिनदार महेश जगदाळे यांनी केले आहे. कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी देवस्थान कमिटीचे सर्व सदस्य, भरणे ग्रामस्थ प्रयत्नशील आहेत.

धामणंद विभागातील
१० सरपंच शिंदे गटात
खेड, ता. १२ ः तालुक्यातील धामणंद विभागातील ठाकरे गटातील दहा सरपंचांनी असंख्य शिवसैनिकांसह बाळासाहेबांची शिवसेना या शिंदे गटात प्रवेश केला. हा प्रवेश म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाची अनोखी भेट असल्याचे बाळासाहेबांची शिवसेनेचे नेते माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी सांगितले.
रामदास कदम म्हणाले, ‘‘२० वर्षांनी मी पंधरा गाव धामणंद विभागातील सह्याद्रीच्या छायेतील निवे, सार्पिली, पोसरे, धामणंदसह बायें आदी २२ गावांना भेटी देत तेथील ग्रामस्थांशी सुसंवाद साधण्यासाठी हा दोन दिवसाचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान जनतेचे माझ्यावरील प्रेम आणि जिव्हाळा अद्यापही कायम असल्याचे ठिकठिकाणी स्वागत करून ग्रामस्थांनी दाखवून दिले. गुहागर मतदारसंघातील खाडीपट्ट्यातील गावांसह धामणंद १५ गाव विभागातील गावच्या विकासाची कामे राबवणे ही माझी जबाबदारी आहे. या विभागातील गावात विकासाची कामे राबवण्यात वचनबद्ध आहे.’’

तालुक्यातील वावेतर्फे खेडमधील सरपंच महेश उतेकर, साखर विक्रम शिंदे, सार्पिली सुरेखा पालांडे, मुसाड मयुरी निर्मळ, कोतवली अनता तांबे, कुरवळजावळी स्वाती उतेकर, धामणंद राजू वाघमारे, पोतरे सतिदा खेरटकर, चिरणी पांडुरंग जानकर, चोरवणे अश्विनी मेस्त्री अशा १० सरपंच, उपसरपंच यांनी बाळासाहेबांची शिवसेना जाहीर प्रवेश केल्याची माहिती दिली.