रत्नागिरी ः सावंत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः सावंत
रत्नागिरी ः सावंत

रत्नागिरी ः सावंत

sakal_logo
By

पत्रकार वारिशेंच्या कुटुंबाला २५ लाख
पालकमंत्री उदय सामंत; मुलाला शासकीय सेवेत कायमस्वरूपी नोकरी देणार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १२ ः राजापूर येथील मृत पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून २५ लाख रुपयांची मदत देण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. त्यांच्या मुलाला कायमस्वरुपी नोकरीचीही हमी मंत्री सामंत यांनी घेतली आहे.
येथील रोजगार महामेळाव्याच्या निमित्ताने पालकमंत्री उदय सामंत यांच्या पत्रकार परिषदेत स्थानिक पत्रकारांनी राजापूर येथील मृत पावलेल्या शशिकांत वारिशे यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून मदत मिळावी, अशी मागणी केली. वारिशे यांच्या मृत्यूमुळे त्यांचा मुलगा आणि आजीवर संकट कोसळले आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी महाराष्ट्रातील पत्रकारांकडून सातत्याने प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. पत्रकारांच्या या मागणीची दखल घेत पालकमंत्री सामंत यांनी तत्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दहा लाख रुपये आणि इतर माध्यमातून पंधरा लाख रुपये अशी मदत मृत वारिशे यांच्या कुटुंबीयांना देण्यात येईल, असे मंत्री सामंत यांनी जाहीर केले. या शिवाय वारिशे यांच्या मुलाला कायमची नोकरी देण्याची जबाबदारीही श्री. सामंत यांनी स्वीकारली.
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘‘पत्रकार वारिशे यांची हत्या राजापूर येथे करण्यात आली होती. या प्रकरणी संबंधितांवर कारवाईही झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी तत्काळ मदतीची घोषणा करण्याचे आदेश दिले आहेत. ती कशी करायची, ही जबाबदारी सरकारची आहे. अशी दुर्दैवी घटना भविष्यात घडू नये याची प्रशासनाने दखल घेतलेली आहे. पुढील दौऱ्‍यात स्वतः जाऊन भेट घेणार आहे. सांत्वन करून व्यक्ती परत येणार नाही; मात्र त्यांच्या कुटुंबाला शासन वाऱ्‍यावर सोडणार नाही. वारिशे कुटुंबाला मदत करण्याची जबाबदारी शासनाची आहे.’’