दोषींवर खुनाचा गुन्हा दाखल करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दोषींवर खुनाचा गुन्हा दाखल करा
दोषींवर खुनाचा गुन्हा दाखल करा

दोषींवर खुनाचा गुन्हा दाखल करा

sakal_logo
By

82428
सावंतवाडी ः येथील शोकसभेस उपस्थित पदाधिकारी.

दोषींवर खुनाचा गुन्हा दाखल करा

सावंतवाडी शोकसभेत मागणी; पत्रकार वारीशे मृत्यू प्रकरण

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १२ ः राजापूर (जि. रत्नागिरी) येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या अपघाती मृत्यूची न्यायालयीन चौकशी करावी. फास्टट्रॅक न्यायालयाच्या माध्यमातून हा खटला चालवून दोषींवर खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी येथे आयोजित शोकसभेत करण्यात आली. समाजाचा प्रश्न सोडवित असताना त्यांना जीव गमवावा लागला. त्यामुळे त्यांच्या मृत्यूला शासनाने शहिदाचा दर्जा द्यावा, असे आवाहनही यावेळी उपस्थितांनी केले.
येथील केशवसुत कट्ट्यावर वारीसे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी काल (ता.११) शोकसभेचे आयोजन केले होते. यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी नगराध्यक्ष सुरेश भोगटे, माजी नगरसेविका अफरोज राजगुरू, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, सिंधुदुर्ग डिजिटल मीडिया अध्यक्ष अमोल टेंबकर, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण मांजरेकर, हरिश्चंद्र पवार, सीताराम गावडे, विजय देसाई, रुपेश पाटील, राजेश मोंडकर, शुभम धुरी, विनायक गावस, भुवन नाईक, सुंदर गावडे, सुरेश म्हसकर, गिरिधर परांजपे, शाम भाट, प्रसाद पावसकर, राजू मसूरकर, रवी जाधव आदी उपस्थित होते. डॉ. परुळेकर यांनी वारीशे यांच्यासारख्या समाजाचा आवाज उठविणाऱ्या पत्रकाराचा गळा घोटण्याचा झालेला प्रयत्न दुर्दैवी असल्याचे सांगितले. त्यामुळे अपघातास कारणीभूत असलेल्या वाहनचालकासह हा घात घडवून आणणाऱ्या ‘मास्टरमाईंड’वरही खुनाचा गुन्हा दाखल करा. वारीशे यांना समाजाचा प्रश्न सोडवत असताना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे त्यांच्या मृत्यूला शहिदाचा दर्जा द्या, अशी मागणीही त्यांनी केली.