टेक्नोवर्ल्ड- सावध, नजर ठेऊन आहे

टेक्नोवर्ल्ड- सावध, नजर ठेऊन आहे

rat१३११.txt

(टुडे पान ३ साठी)
(७ फेब्रुवारी टुडे तीन)

फोटो ओळी
-rat१३p१.jpg -
८२४०८
संतोष गोणबरे
---
टेक्नोवर्ल्ड ..... लोगो


हो, सावध रहा! तुमच्यावर नजर रोखलेली आहे. तुमची प्रत्येक कृती, इशारा किंवा हालचाल जगातील प्रत्येक डोळ्याला साक्षीदार बनवत आहे. खरं तर तंत्रज्ञानाने खागीपण अगदी उघडा करून टाकला आहे. त्यामुळे चांगली आणि वाईट कृती; दोन्हीही सरसकट सर्वांच्या नजरेत भरतात आणि विष्लेषण करून प्रत्येकजण स्वत:चे मत बनवू शकतो. कारण क्लोज सर्किट टेलिव्हिजन (सीसीटीव्ही) नावाचे हे तंत्रज्ञान म्हणजे हा एक कॅमेरा असतो जो निगराणी किंवा रक्षणासाठी वापरला जातो. सीसीटीव्ही प्रामुख्याने घराच्या प्रवेशद्वार किंवा कार्यालय, रुग्णालय, सार्वजनिक ठिकाणे इत्यादी ठिकाणी लावला जातो आणि सगळ्यांना गुप्तहेराच्या भिंगाखाली बंदिस्त केलं जातं. आजच्या जगामध्ये हे खूप महत्त्वाचे तंत्र कसे ठरले आहे. याबद्दल ...

प्रा. संतोष गोणबरे, चिपळूण
---
सावध, तुमच्यावर नजर ठेऊन आहे...

सीसीटीव्ही कॅमेरा समोर होणारी प्रत्येक हालचाल रेकॉर्ड करतो आणि मुख्य रिसिव्हर संगणकावर पाठवतो. मुख्य संगणक त्याचे सर्व रेकॉर्डिंग त्याच्या हार्ड ड्राइव्ह मध्ये जमा करून ठेवतो. जेव्हा हे रेकॉर्डिंग आवश्यक असते तेव्हा ते वापरले किंवा तपासले जाते. सीसीटीव्ही लाईव्ह चालत असला तर तो तुम्हाला लाईव्ह पाहता येऊ शकतो. सीसीटीव्ही कॅमेरा सिग्नल किंवा रेकॉर्डिंग प्रसारित करण्यासाठी वायरलेस किंवा वायर असलेल्या ट्रान्समीटरचा वापर करतो. याची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा कॅमेरा व्हिडिओ आणि ऑडिओ दोन्ही प्रसारित करू शकतो. त्यामुळे याला व्हिडिओ सर्व्हेलन्स असंही म्हटलं जातं. सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कमी प्रकाशातील छायाचित्रे रेकॉर्ड करण्याची नाईट व्हिजन क्षमता देखील असते. आज अशी सिस्टम तयार झाली आहे की, आपण आपल्या घरात, घराबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेराची माहिती आपल्या मोबाईलवर तसेच लॅपटॉपवर देखील बघु शकतो. सध्या चेहरा पडताळणारे (फेस जॉग्राफी) सॉफ्टवेअर सीसीटीव्हींना जोडले जात आहे. त्यातून गुन्हेगारी जगतातील संशयित चेहरे ओळखण्यास मदत होते आणि पुढे घडणारा अनर्थ टळू शकतो. २००१ मध्ये न्यूयॉर्कमधील ९/११च्या हल्ल्यानंतर जगाने आणि मुंबई येथील २६/११च्या हल्ल्यानंतर महाराष्ट्र सरकारने सर्व शहरांत सीसीटीव्हींचे जाळे उभारले. रस्त्याकडील साध्या पानटपरीपासून बडय़ा मॉल, गृहनिर्माण संस्थांपर्यंत, छोटय़ा-मोठय़ा सिग्नलवर सर्वत्र सीसीटीव्हींचे जाळे पसरले आहे. एवढंच कशाला, जर तुम्ही वाहतुकीचा एखादा नियम मोडलात तर परस्पर दंडाची पावती तुमच्या मोबाईलवर येऊन धडकते, ती याच तंत्रज्ञानामुळे. ज्ञात असलेला पहिला सीसीटीव्ही कॅमेरा जर्मनीमधील सीमेंस ए. जी. याने विकसित केला. हे कॅमेरे युद्धात रॉकेटच्या प्रक्षेपणाचे निरीक्षण करण्यासाठी बनवले होते. वॉल्टर ब्रूच याने दुसऱ्या महायुद्धाच्या काळात म्हणजे १९४२ साली ब्रेक थ्रू सिस्टम तयार करून शस्त्रास्त्रांवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही तंत्रज्ञानाचा वापर केला. प्रत्यक्षात सीसीटीव्हीच्या पहिल्या दस्तऐवजांनुसार जर्मन सैन्य एका बंकरच्या आतून रॉकेट प्रक्षेपणांचे निरीक्षण करू शकत होते, मात्र त्यांचे रेकॉर्डिंग होत नसे. अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी या तंत्रज्ञानाचा उपयोग अणुबॉम्बच्या परिणामांच्या चाचण्या घेण्यासाठी केला होता. १९४९ मध्ये अमेरिकेच्या एका कंपनीने प्रथम व्यावसायिक सीसीटीव्ही दूरदर्शन प्रणाली सुरू केली. न्यूयॉर्कमधील ओलीन हे मुख्य रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविणारे जगातील पहिले शहर होते.
स्वस्तातील सीसीटीव्ही कॅमेरे हॅक करणे सोपे आहे. त्यातील रेकॉर्डिंगही नष्ट करता येते, तसेच कॅमेरा बंद केला जाऊ शकतो. ब्रँडेड कॅमेऱ्‍यांची हॅकिंग कठीण आहे, मात्र त्यांची किंमत नॉन ब्रँडेड कॅमेऱ्‍यांपेक्षा तीन पटीने जास्त आहे. बाजारात पाचशे रुपयांपासून दहा हजार रुपयापर्यंत हे कॅमेरे उपलब्ध आहेत. सर्वात जास्त हाय क्वालिटी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची किंमत ५० हजार रुपयांपर्यंत असू शकते. घरगुती सुरक्षेसाठी ‘सिक्योर आय’ कंपनीचे नाव मोठे आहे. या कॅमेऱ्यात तुम्हाला ८ मेगापिक्सलची रिझॉल्यूशन लेन्स मिळते. तसेच यात स्मार्ट डिटेक्शन आणि इन्फ्रारेंड कट फिल्टर सुद्धा देण्यात आले असून हा कॅमेरा वातावरण संरक्षित आहे. या कॅमेऱ्याला आयफोन, आयपॅड किंवा अँड्रॉयडच्या कोणत्याही फोनला जोडता येतो. खासगी सुरक्षेसाठी बुलेट आणि डोम कॅमेरे हे प्रकार सर्वात जास्त वापरले जातात. हे पातळ, दंडगोलाकार कॅमेरे एका निश्चित दृश्यावर लक्ष केंद्रित करतात आणि येण्याजाण्याच्या मार्गावर करडी नजर ठेवतात. यात दरवाजावर बसविण्यात येणारा डोअरबेल कॅमेऱ्यामध्ये व्हिडिओ रेकॉर्डर आणि स्पीकर असतो; जो रहिवाशांना दारात असलेल्या व्यक्तीशी संवाद उपलब्द करून देतो, त्याआधारे ओळख पटविणे सोपे होते. भारतात सौरऊर्जेवर चालणारे सीसीटीव्ही कॅमेरे सध्या लोकप्रिय होत आहेत. या कॅमेऱ्यांमध्ये वरच्या बाजूला सोलर पॅनल असते आणि ते अंगभूत बॅटरीसह येतात. या कॅमेऱ्यांमध्ये वाय-फाय क्षमता, मोशन डिटेक्टर आणि इतर अनेक वैशिष्ट्ये आहेत.
असे असले तरी आपण एखाद्या व्यक्तीच्या खासगी खोलीत किंवा खाजगी वावराच्या जागेत त्याच्या परवानगीशिवाय सीसीटीव्ही कॅमेरा लावू शकत नाही. असे केल्यास आपल्यावर कारवाई देखील होऊ शकते. तसे केल्यास आयटी अँक्ट २००० नुसार स्पाय कँमेरा अनधिकृत वापरामध्ये तुमच्यावर तक्रार दाखल होऊन तुरुंगात जावून बसावे लागेल, हे लक्षात असू द्या. जर आपण एखाद्या स्त्रीच्या अंत:गृहात तिच्या नकळत सीसीटीव्ही कॅमेरा लावला तर आयपीसी कलम ३५४ क नुसार कमीत कमी एक ते तीन वर्ष तुरूंगात सडावे लागेल. उद्योग तज्ञांच्या मते, भारताच्या सीसीटीव्ही बाजारपेठेने २०२१-२६ या कालावधीत २२.३५% चा CAGR (एकत्रित वार्षिक वाढ दर) नोंदवणे अपेक्षित आहे. गोदरेज, सोनी, सीपी प्लस, झिकॉम, सिक्युर आय, एमआय, क्वोबो, रियलमी, हिकव्हिजन, बीटेल, पॅनासोनिक, दाहुआ, यूएनव्ही, स्वान इत्यादी कंपन्या भारतात होम सिक्युरिटी कॅमेरे देणारे विविध ब्रँड आहेत. खरं तर, माणूस जेव्हा दुष्कृत्यांकडे झुकतो तेव्हा अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाची गरज प्रकर्षाने जाणवते. त्यातून नजर ठेवण्यायोग्य आणि अयोग्य अशा दोन्ही बाबी एकत्रित प्रकाशात येतात. काय लपवावे आणि काय दाखवावे, याचा जर सदसदविवेकबुद्धीने विचार केला नाही तर निष्पाप जीव हकनाक भरडले जातात आणि गैरफायदा घेणारे एखाद्याचे आयुष्य उदध्वस्त करतात. त्यामुळे मॉलमधील चेंजिंग रुममध्ये वा इतर ठिकाणी वावर असावा सावध, कुणीतरी तुमच्यावर नजर रोखून आहे..!

(लेखक महाविद्यालयाचे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक आहेत.)
--

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com