
रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा
rat1314.txt
(टुडे पान 2 साठी)
फोटो ओळी
-rat13p12.jpg-
82410
रत्नागिरी : शिवजयंती निमित्त शालेय शिवकिल्ला आयोजित स्पर्धेसाठी पोस्टरचे अनावरण करताना
------------
शालेय शिवकिल्ला स्पर्धा होणार
रत्नागिरी : युथ फेस्टिवल आर्टिस्ट असोसिएशन आणि मराठा मंदिर ग्लोबल स्कूलतर्फे शिवजयंतीनिमित्त शालेय स्तरावर शिवकिल्ला निर्माण स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. शालेय स्तरावर शिवचैतन्य निर्माण व्हावे, म्हणून ही स्पर्धा होत आहे. या स्पर्धेच्या पोस्टर प्रकाशनावेळी ममता नलावडे, संतोष नलावडे आणि युथ फेस्टिवल आर्टिस्ट असोसिएशनचे सदस्य कार्यक्रमाला उपस्थित होते.
माळनाका येथील ग्लोबल स्कूल येथे मागील मैदानामध्ये स्पर्धा होणार आहे. स्पर्धेसाठी एका शाळेचे जास्तीत जास्त 2 संघ सहभागी होऊ शकतात. संघामध्ये 7 सदस्य असावेत. त्यामध्ये शिक्षक, विद्यार्थी आणि कर्मचारीसुद्धा सहभागी होऊ शकतात. सर्वांना सहभाग प्रमाणपत्र मिळणार आहे. प्रथम क्रमांक पाच हजार रुपये, द्वितीय तीन हजार रुपये आणि तृतीय दोन हजार रुपये, उत्तेजनार्थ एक हजार रुपये अशी पारितोषिके आहेत. स्पर्धा प्रमुख ओंकार बंडबे आणि स्पर्धा समन्वयक म्हणून ग्लोबल स्कूल मुख्याध्यापिका कविता विश्वकर्मा, सूरज बने, सचिन लांजेकर काम बघणार आहेत, अशी माहिती युथ फेस्टिवल आर्टिस्ट असोसिएशनचे मुख्य समन्वयक डॉ. आनंद आंबेकर यांनी दिली.
--
राज्यस्तरीय तायक्वॉंदो संघ रवाना
रत्नागिरी ः राज्यस्तरीय कॅडेट स्पर्धेसाठी रत्नागिरीचा संघ वर्धा येथे रवाना झाला. पाचव्या तायक्वॉंदो स्पर्धेत रत्नागिरीतून गणराज तायक्वॉंदो क्लबची त्रिशा मयेकर आणि एसआरके तायक्वॉंदो क्लबचे सार्थक चव्हाण, आदिष्टी काळे यांचा समावेश आहे. तायक्वॉंदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या मान्यतेने तायक्वॉंदो स्पोर्ट असोसिएशन, नाचणगाव, देवळी, (वर्धा) आयोजित ही स्पर्धा फुलगाव येथील लक्ष्मी सेलिब्रेशन हॉलमध्ये होणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना राज्य संघटनेचे अध्यक्ष अविनाश बारगोजे, उपाध्यक्ष विनायक गायकवाड आणि धुलीचंद मेश्राम, अतिरिक्त उपाध्यक्ष प्रवीण बोरसे, महासचिव मिलिंद पाठारे, सचिव सुभाष पाटील, खजिनदार व्यंकटेश कररा यांनी शुभेच्छा दिल्या.