लांजा-लांजा मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लांजा-लांजा मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
लांजा-लांजा मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

लांजा-लांजा मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

sakal_logo
By

rat१३२०.txt

बातमी क्र. २० (टुडे पान २ साठी)

फोटो ओळी
-rat१३p१५.jpg-
८२४३५
लांजा ः मॅरेथॉन स्पर्धेत धावणारे बालदोस्त.
-

लांजा मॅरेथॉन स्पर्धेत पाचशे स्पर्धक
लांजा, ता. १३ ः शहरातील संदीप स्मृती मित्रमंडळातर्फे आयोजित लांजा मॅरेथॉन स्पर्धेत लांजावासीय धावले. साटवली फाटा (लांजा) येथे झालेल्या स्पर्धेला विद्यार्थ्यांसह महिला, पुरुष आणि सर्वच स्पर्धकांचा उदंड प्रतिसाद लाभला. ५०४ स्पर्धक सहभागी झाले होते.
साटवली रोड तिठा ग्रामीण रुग्णालयाच्या बाजूला स्पर्धेचे उद्‌घाटन तहसीलदार प्रमोद कदम, गटविकास अधिकारी यशवंत भांड यांच्या हस्ते झाले. या वेळी मंडळाचे अध्यक्ष मनोहर बाईत, उद्योजक भगवान ढेकणे, नगरसेविका दुर्वा शेट्ये, प्रसाद भाईशेट्ये, गुरुप्रसाद देसाई, वैभव जोईल आदी उपस्थित होते. स्पर्धेमध्ये लांजा हायस्कूल, लांजा शाळा क्र. ५, शाळा क्र. एक, ज्ञानेश्वर विद्यामंदिर या प्रशालांसह तालुक्यातील अन्य शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांचे विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

----------