साडवली-देवरुखात 18, 19 ला कथ्थक नृत्य महोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साडवली-देवरुखात 18, 19 ला कथ्थक नृत्य महोत्सव
साडवली-देवरुखात 18, 19 ला कथ्थक नृत्य महोत्सव

साडवली-देवरुखात 18, 19 ला कथ्थक नृत्य महोत्सव

sakal_logo
By

rat१३२२.txt

(टुडे पान २ साठी)

देवरुखात शनिवारपासून कथ्थक नृत्य महोत्सव

साडवली, ता. १३ ः देवरूख ललित कला अॅकॅडमीच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आणि उद्योजक बाळासाहेब पित्रे व विमलताई पित्रे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दोन दिवसांचा कथ्थक नृत्य महोत्सव होणार आहे. कथ्थक नृत्यासंदर्भात रंगसूत्र व अवतारगाथा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. १८ ला सकाळी ९.३० ते २ या वेळेत रंगभूषा, केशभूषा, रंगसंगत, रंग सजावट, नेपथ्य या विषयावर चर्चा व प्रात्यक्षिक होणार आहे. यासाठी मार्गदर्शक म्हणून भरतनाट्यम् विशारद अमोल कापशे (अलिबाग) उपस्थित राहणार आहेत.
विशेष अभिनय अंग कार्यशाळेसाठी नृत्यालंकार मनीषा जोशी (सोलापूर) उपस्थित राहणार आहेत. कांजिवरा अपरान्त हॉलिडे येथे कार्यशाळा होणार आहे. १८ ला सायंकाळी ६ ते ९ या वेळेत गुरू शिल्पा मुंगळे (नृत्यालंकार) व त्यांच्या विद्यार्थिनींची विशेष नृत्य प्रस्तुती पाहायला मिळणार आहे. १९ ला सायंकाळी ६ ते ९ या वेळेत गुरू मनीषा जोशी, गुरू अमोल कापसे व त्यांच्या विद्यार्थिनींचे नृत्यप्रकार पाहायला मिळतील. हे दोन्ही कार्यक्रम पित्रे कलामंच रंगमंचावर सादर होणार आहेत. यावेळी कथ्थक नृत्यात पदवी मिळवलेल्या नृत्यांगनांना सन्मानित करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी नृत्य विशारद स्कंधा चितळे यांच्याशी संपर्क साधावा.