भालावलला आज त्रैवार्षिक गोंधळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भालावलला आज त्रैवार्षिक गोंधळ
भालावलला आज त्रैवार्षिक गोंधळ

भालावलला आज त्रैवार्षिक गोंधळ

sakal_logo
By

८२४५६
भालावलला आज त्रैवार्षिक गोंधळ
बांदा ः भालावल-धनगरवाडी येथे कोकरे परिवार देवीचा त्रैवार्षिक गोंधळोत्सव उद्या (ता. १४) विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. यानिमित्त दुपारी ३ वाजता देवी पूजन, सायंकाळी ४ वाजल्यापासून ओटी भरणे कार्यक्रमास सुरुवात, रात्री ८ पासून भोजनाचा कार्यक्रम, रात्री १० वाजता गोंधळोत्सव होणार आहे. सर्व भाविकांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन देवस्थान पुजारी बाबू कोकरे, लक्ष्मण कोकरे यांनी केले आहे.
--
बांदा येथे उद्या रामदास नवमी
बांदा ः येथील श्री विठ्ठल मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे बुधवारी (ता. १५) श्री रामदास नवमी उत्सवाचे आयोजन केले आहे. यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक होणार आहेत. सकाळी श्री विठ्ठल-रखुमाईची नित्य पूजा, समर्थ श्री रामदास स्वामींच्या प्रतिमेचे पूजन, दुपारी नैवेद्य व आरती होऊन महाप्रसादाला आरंभ होईल. सायंकाळी ५.३० वाजता वारकरी संत श्री रेगडे महाराज यांचा वारकरी मंडळींच्या समवेत हरिपाठ कार्यक्रम, सायंकाळी ७ वाजता नित्य आरती, रात्री स्थानिक भजन सेवेने सोहळ्याची सांगता होईल. भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री विठ्ठल मंदिर, बांदाच्यावतीने केले आहे.