
रत्नागिरी-क्राईम
rat1317. txt
निवळीतून वृद्ध बेपत्ता
रत्नागिरी ः तालुक्यातील निवळी-मालपवाडी येथील गुरे चरवण्यासाठी गेलेला वृद्ध घरी परतला नाही. ग्रामीण पोलिस ठाण्यात ते बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. दत्ताराम सखाराम मालप (वय ७०, रा. मालपवाडी-निवळी, रत्नागिरी) असे बेपत्ता वृद्धाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. २) सकाळी साडेसातच्या सुमारास घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वृद्ध मालप हे गुरुवारी सकाळी साडेसात वाजता जनावरे चरविण्यासाठी घेऊन गेले होते. रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नाही. त्यांचा नातेवाईकांकडे व इतरत्र शोध घेऊन सापडले नाही. या प्रकरणी त्यांच्या मुलगा भिकाजी मालप याने रविवारी (ता. ५) ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर दिली. खबरीवरुन पोलिसांनी मालप बेपत्ता झाल्याची नोंद केली आहे. अधिक तपास पोलिस हवालदार बेर्डे करत आहेत.
------
करबुडेतील वृद्ध महिलेचा आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी ः तालुक्यातील करबुडे-शितपवाडी येथील वृद्ध महिलेला भाकरी खाताना ठसका लागला. उपचारासाठी तिला करबुडे येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचार दरम्यान तिचा मृत्यू झाला. लक्ष्मी राजका शितप (वय ६५, रा. शितपवाडी-करबुडे, रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. १२) पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वृद्ध महिला शितप यांना शनिवारी (ता. ११) रात्री भाकरी खाताना ठसका लागला. अस्वस्थ वाटू लागल्याने नातेवाईकांनी गावातील डॉक्टरकडे नेले. अधिक उपचारासाठी तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. उपचार दरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.