
प्रेम ही भावना नवी ऊर्जा, नवी प्रेरणा देणारी
rat१३३४.txt
(पान ३ किंवा ५ साठी)
(टीप- नियोजनातील विषय़)
''व्हॅलेंटाइन ''डे'' स्पेशल.....................लोगो
प्रेम ही भावना नवी ऊर्जा, प्रेरणा देणारी
डॉ. शाश्वत शेरे ; आयुष्यात येते सकारात्मकता
रत्नागिरी, ता. १३ : प्रेम ही भावना मनाला सुखावणारी, नवी ऊर्जा देणारी आणि आयुष्याला नवी प्रेरणा देणारी आहे. आपल्या जोडीदारासाठी काहीतरी करून दाखविण्याची उर्मी यातुन उत्पन्न होते. जाती भेद, वर्ण भेद, धर्म भेद विसरायला लावणारी ही एक देवाची देणगीच म्हणावी लागेल. आयुष्यात सकारात्मकता आणण्याचे काम प्रेम करतं, असे मत मानसोपचारतज्ञ डॉ. शाश्वत शेरे यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले.
मंगळवारी (ता. १४) ''व्हॅलेंटाइन ''डे'' निमित्त प्रेमातील सकारात्मकता, या विषयावर बोलताना त्यांनी प्रेम आणि त्यातील ओलाव्या याविषयी अनमोल संदेश दिला. भारतीय परंपरेनुसार येणारा संक्रांत हा सण जसा सर्वांवर प्रेम करावे, सर्वांशी गोड संबंध असावेत, नेहमी सर्वांशी गोड बोलावे, कुठल्याही अपेक्षेशिवाय आपल्याला दुसऱ्याला काहीतरी देता यावे यासाठी योजला आहे. तसाच पाश्चिमात्य परंपरेतील एक सण आहे ''व्हॅलेंटाइन ''डे''. उत्सवप्रिय भारतीयांनी या ही दिवसाचा स्वीकार केला आहे. प्रेम व्यक्त करण्यात चुकीचे काही नाही. मात्र व्हॅलेंटाइन डे या दिवशी व्यक्त केलेले प्रेम एका व्यक्तीपुरते सीमित न ठेवता हृदयात सर्वांप्रती प्रेमभावना असली आणि कुठल्याही अपेक्षेशिवाय सर्व प्राणिमात्रांवर प्रेम करता आले तर ते आरोग्याच्यादृष्टीनेही सर्वोत्तम असते, असा नवा संदेश आता फिरू लागला आहे. त्याचाही स्वीकार करण्याची गरज आहे.
त्यानिमित्ताने प्रेमाच्या सकारात्मकतेबाबत रत्नागिरीतील मानसोपचार तज्ञ डॉ. शेरे यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले, प्रेम ही निखळ, निरागस भावना आहे. प्रेमामुळे आयुष्याला वेगळी प्रेरणा मिळते. आपल्या आयुष्यात येणाऱ्या जोडीदाराबरोबर सारखे बोलावे त्याला भेटावे वाटते. आपल्या मनावर असलेला ताणतणाव, दडपण त्यामुळे कमी होते. या भावना वेळीच बाहेर पडण्याची गरज असते. अन्यथा वेगळ्या पद्धतीने त्या बाहेर पडू शकतात. आतापर्यंत आपण चित्रपटांमध्ये पाहात होतो की, प्रेमाला जात, पात, वर्ण-धर्म काही नसतो. परंतु ही वस्तुस्थिती आहे. एखादी व्यक्ती प्रेमात पडली तर प्रेम जाती भेद, वर्ण, धर्म भेद विसरायला लावणारी ही भावना आहे. ज्या व्यक्तीबाबत आपल्या मनात प्रेम निर्माण होते, त्या भावनेला प्रतिसाद मिळणे आवश्यक आहे. दोन्ही बाजूने प्रतिसाद मिळतो तेव्हा प्रेमाची गुंफण होऊन ती मने जुळतात, एकमेकांचा विचार करतात.