चिपळूण-जिल्हाध्यक्षपदी डॉ. संदीप जाधव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण-जिल्हाध्यक्षपदी डॉ. संदीप जाधव
चिपळूण-जिल्हाध्यक्षपदी डॉ. संदीप जाधव

चिपळूण-जिल्हाध्यक्षपदी डॉ. संदीप जाधव

sakal_logo
By

फोटो ओळी
rat13p35.jpg- KOP23L82545 चिपळूण ः होमिओपॅथिक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झालेल्या डॉ. संदीप जाधव यांचे अभिनंदन करताना संघटनेचे सदस्य.
-------
होमिओपॅथिक संघटनेच्या
जिल्हाध्यक्षपदी डॉ. जाधव
चिपळूण, ता. १३ ः रत्नागिरी जिल्हा होमिओपॅथी डॉक्टर असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षपदी गुहागर तालुक्यातील देवघर येथील डॉ. संदीप जाधव यांची एकमताने निवड झाली आहे. चिपळूण येथील माटे सभागृहात झालेल्या असोसिएशनच्या जिल्हा बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली.
माजी अध्यक्ष डॉ. अरुण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. दादा इदाते, चिपळूणच्या माजी सभापती पूजा निकम उपस्थित होत्या. संघटनेच्या वतीने पद्मश्री दादा इदाते व सौ. निकम यांचा सत्कार करण्यात आला. संघटनेच्या जिल्हा सचिवपदी खेडचे डॉ. विलायत मुकादम यांची निवड करण्यात आली. यानंतर तालुकास्तरीय बैठका घेऊन जिल्हा कार्यकारिणी घोषित केली जाईल, असे अध्यक्ष डॉ. जाधव यांनी सांगितले. डॉ. रणजित पाटील, डॉ. संदीप भागवत, डॉ. सुभाष उतेकर, डॉ. समरसेन सावंत, डॉ. भगवान नारकर, डॉ. दाभोळकर, डॉ. पाध्ये आदी पदाधिकारी उपस्थित होते.