वैभववाडीतील अतिक्रमण हटविले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वैभववाडीतील अतिक्रमण हटविले
वैभववाडीतील अतिक्रमण हटविले

वैभववाडीतील अतिक्रमण हटविले

sakal_logo
By

82555
वैभववाडी ः तहसील कार्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावरील अज्ञातांनी केलेले अतिक्रमण महसूल विभागाने सोमवारी हटविले.

वैभववाडीतील अतिक्रमण हटविले

तहसील कार्यालयाची कारवाई; अज्ञातांचा प्रकार हाणून पाडला

सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. १३ ः येथील तहसिल कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला स्टॉलसाठी जागा निश्चित करण्यासाठी केलेले अतिक्रमण आज हटविण्यात आले. तहसील कार्यालयाकडून ही कारवाई करण्यात आली. दोन दिवसांपूर्वी अज्ञातानी हे अतिक्रमण केले होते.
वैभववाडी नगरपंचायतीच्यावतीने शहरातील शासकीय जागेतील अतिक्रमण हटविण्याची भुमिका घेतली आहे. त्याअनुशंगाने शहरात उभारलेले स्टॉल हटविण्यासाठी स्टॉलधारकांना नोटीसा बजावल्या आहेत. शहरातील स्टॉल शुक्रवारी हटविण्याची तयारी नगरपंचायतीने केली होती. मात्र, काही स्टॉलधारकांनी दुकाने काढण्यासाठी मुदत वाढवून मागितली. काहींनी पर्यायी जागेची मागणी नगरपंचायतीकडे केली होती. या मागणीच्या अनुषंगाने शहरातील गणपतीसानाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूच्या भागाची नगरपंचायतीने साफसफाई केली होती. त्याचवेळी तहसील कार्यालयाकडे येणारा मार्गचीही साफसफाई केली होती. या भागात स्टॉल लागणार असल्याची माहिती मिळताच काही अज्ञातांनी शनिवारी (ता.११) रातोरात या भागात बांबू, कापड लावून जागा अडवून ठेवल्या. सुमारे वीसहून अधिक दुकाने बसतील एवढी जागा निश्चित करुन ठेवेली होती. अखेर नायब तहसीलदार यमगेकर यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.
-----------
चौकट
चौकशी करण्याची मागणी
महसूल विभागाची मालकी असलेल्या जागेत अतिक्रमण करून स्टॉलसाठी जागा अडवून ठेवण्यात आल्या होत्या. थेट महसूलच्या जागेत अतिक्रमण करण्याच धाडस अज्ञातांनी दाखविले. या प्रकारामागे नेमके कोण आहे? याची चौकशी होणे गरजेचे आहे. ज्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यांचाही शोध घेणे आवश्यक आहे, अशी मागणी काही स्थानिकांनी केली.
---------
चौकट
‘तो’ पत्र्याचा स्टॉल कुणाचा?
तहसील कार्यालयासमोरच पत्र्याचा एक खोका गेल्या काही दिवसांपासून तेथे आहे. शहरात नगरपंचायतीने स्टॉल हटाव मोहीम राबविण्याची आक्रमक भूमिका घेतल्यानंतर तो स्टॉल या ठिकाणी लावण्यात आला आहे. मात्र, तो स्टॉल नेमका कोणाचा आहे, हे अद्याप कोणालाही कळलेले नाही.