
माझ्या चौकशीत ठेकेदारांना गोवून नाहक त्रास
rat१३३३.txt
(पान ३ साठीमेन)
माझ्या चौकशीत ठेकेदारांना गोवून नाहक त्रास
आमदार साळवी ; आमदार निधीच्या कामाचे ठेके स्थानिकांचे
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १३ ः अॅन्टी करप्शन ब्युरोकडून माझ्यासह माझ्या स्वीय सहाय्यकाची चौकशी सुरू आहे. माझ्या चौकशीला मी सामोरे जात असून त्याला सहकार्यही करीत आहे. आता आपल्या आमदार निधीतून केलेल्या कामांच्या अनुषंगाने संबंधित ठेकेदारांनाही चौकशीची नोटीस बजावण्यात आली आहे. या चौकशीमध्ये ठेकेदारांना गोवून नाहक त्रास कशासाठी ? असा सवाल आमदार राजन साळवी यांनी पत्रकार परिषदेत केला.
आमदार साळवी म्हणाले, आपल्या आमदार निधीतून झालेली कामे स्थानिक ठेकेदारांनी केली असून त्यांना नाहक त्रास देऊ नये. आमदार राजन साळवी यांच्यासह त्यांच्या स्वीय सहाय्यकांची अॅन्टी करप्शन ब्युरोकडून चौकशी केली जात आहे. आता त्यांच्या आमदार निधीतून केलेल्या कामांच्या अनुषंगाने संबंधित ठेकेदारांनाही चौकशीची नोटीस बजावण्यात आली आहे. या साऱ्या घडामोडींच्या अनुषंगाने आमदार साळवी यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला.
साळवी म्हणाले, अॅन्टी करप्शन ब्युरोकडून आपली चौकशी सुरू आहे. त्या चौकशीमध्ये आपण योग्य ती माहिती दिली आहे. त्याचवेळी आपल्या स्वीय सहाय्यकांनाही चौकशीची नोटीस बजावण्यात आली होती. तेही या चौकशीला सामोरे जावून त्यांनी योग्य ती चौकशी अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे. आता आपल्या आमदार निधीतून झालेल्या कामांचे ठेके घेतेलल्या ठेकेदारांना चौकशीच्या नोटीस बजावण्यात आल्या, विकासकामांचे ठेके घेणाऱ्यांमध्ये स्थानिक ठेकेदारांचा समावेश असून त्यांच्या चौकशीचा नेमका उद्देश काय? आपल्या चौकशीला आपण सामोरे गेलो असून भविष्यातही होणाऱ्या चौकशीला सामोरे जाणार आहे. मात्र, यामध्ये ठेकेदारांना नोटीस बजावून नाहक त्रास दिला जावू नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.