
सुकन्या समृद्धी योजनेमुळे पालक चिंतामुक्त
rat१४१५.TXT
बातमी क्र..१५ (टुडे पान ३ साठी, अॅंकर)
फोटो ओळी
-rat१४p१४.jpg ः
८२६५८
राजापूर ः सुकन्या योजनेचे पासबुक प्रदान करताना खासदार विनायक राऊत आणि मान्यवर.
--
सुकन्या समृद्धी योजनेमुळे पालक चिंतामुक्त
खासदार राऊत ; हर्डी शाळेत डाक विभागातर्फे सुकन्याच्या पासबुकांचे वितरण
राजापूर, ता. १४ ः ''पहिली बेटी धनाची पेटी’ या उक्तीचा खरा अर्थ जाणून डाक विभागाने सुकन्या समृद्धीसारखी अभिनव योजना राबवली आहे. या योजनेच्या माध्यमातून मुलीच्या शिक्षणासह लग्नासाठी कराव्या लागणाऱ्या भरमसाठ खर्चाच्या चिंतेतून पालकांची मुक्तता होणार आहे. त्यामुळे सर्व पालकांनी डाक विभागाच्या या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन खासदार विनायक राऊत यांनी केले.
भारतीय डाक विभागाच्यावतीने राबवण्यात येत असलेल्या सुकन्या समृद्धी योजना विशेष अभियानांतर्गत सुकन्या खाते पासबुक प्रदान कार्यकम शहरानजीकच्या हर्डी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये झाला. या वेळी खासदार राऊत बोलत होते.
या वेळी आमदार राजन साळवी, संपर्कप्रमुख सुधीर मोरे, रत्नागिरी डाकघर अधीक्षक एन. टी. करळपकर, सहाय्यक डाकघर अधीक्षक ए. डी. सरंगले, राजापूर डाकघर निरीक्षक बी. बी. हराळे, पोस्टमास्तर जे. के. खरे, माजी पंचायत समिती सदस्य सुभाष गुरव, कोदवली सरपंच विलास गुरव, शिक्षणविस्तार अधिकारी प्रकाश पाध्ये आदी उपस्थित होते.
खासदार राऊत म्हणाले, डाक विभागाच्या अनेक चांगल्या योजना हळूहळू सर्वसामान्यांपर्यत पोहोचत आहेत. डाकखात्यावरील सर्वसामान्यांचा विश्वासही वाढत आहे. सुकन्या समृद्धीसारखी योजना राबवून डाकखात्याने मुलींच्या पालकांची चिंता दूर केली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त पालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. साळवी यांनी मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी पालकांनी ही योजना समजून घेऊन त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. पालकांच्या वतीने साधना बाईत यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी राऊत यांच्या हस्ते मुली व त्यांच्या पालकांना सुकन्या समृद्धी खात्याच्या पासबुकचे वितरण करण्यात आले. तसेच या अभियानात चांगली कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही गौरव करण्यात आला. या वेळी शिवसेनेचे विधानसभा समन्वयक प्रकाश कुवळेकर, उपसरंपच सारिका जड्यार, गावकर पंढरीनाथ जड्यार, सूर्यकांत जड्यार, शाळेचे मुख्याध्यापक ठाकूर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, राजापूर डाक कार्यालयातील कर्मचारी, पालक, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
--
दोन दिवसात ४ हजाराहून अधिक खाती...
रत्नागिरी डाकघर अधीक्षक श्री. कुरळपकर यांनी पोस्ट खात्याच्या विविध योजनांची माहिती दिली. देशाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सुकन्या समृद्धी खाती उघडण्याच्या अभियानामध्ये रत्नागिरी जिल्ह्याने दोन दिवसांमध्ये ४ हजार १७० खाती उघडल्याची माहिती दिली.