आरवली-तळेकांटेदरम्यानच्या रस्ता कामाकडे ठेकेदाराचे दुर्लक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरवली-तळेकांटेदरम्यानच्या रस्ता कामाकडे ठेकेदाराचे दुर्लक्ष
आरवली-तळेकांटेदरम्यानच्या रस्ता कामाकडे ठेकेदाराचे दुर्लक्ष

आरवली-तळेकांटेदरम्यानच्या रस्ता कामाकडे ठेकेदाराचे दुर्लक्ष

sakal_logo
By

rat१४२०.txt

बातमी क्र..२० (टुडे पान २ साठी)

फोटो ओळी
-rat१४p११.jpg ः

८२६५६
संगमेश्वर ः चौपदरीकरण करताना करण्यात आलेल्या रस्त्यावर पडलेले खड्डे.
-----
आरवली-तळेकांटे पर्यायी मार्गाची दुरवस्था

ठेकेदाराचे दुर्लक्ष ; जनआंदोलनाचा इशारा

संगमेश्वर, ता. १४ ः आरवली ते तळेकांटेदरम्यान मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू आहे; मात्र या कामात अनेक त्रुटी असल्याचे अनेकवेळा समोर आले आहे. हे कामही निकृष्ट असल्याचे बोलले जात आहे. नवीन रस्ता अनेक ठिकाणी खचला आहे. काम सुरू असताना वाहतुकीसाठी ठेवण्यात आलेले पर्यायी मार्ग हे सुस्थितीत ठेवणे ठेकेदाराचे काम असताना मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. या मार्गावरून प्रवास करताना फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे तातडीने लक्ष घालून हे मार्ग दुरुस्त न झाल्यास रस्त्यावर उतरून लोकशाही पद्धतीने जनआंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते मिलिंद चव्हाण यांनी दिला आहे .
मुंबई-गोवा महामार्गाच्या कामात अनेक त्रुटी असल्याचे यापूर्वी अनेकवेळा समोर आले आहे. यात काम सुरू असताना पाणी न मारल्याने होणारा धुळीचा त्रास, त्यामुळे अनेक प्रवासीवर्गाला आजाराला सामोरे जावं लागतं आहे. सुरक्षा उपाययोजनांची वानवा, निकृष्ट काम अशा अनेक तक्रारीवरून महामार्ग ठेकेदार कायमच चर्चेत असल्याचे पाहायला मिळते. या विरोधात जनआक्रोश समितीच्यावतीने संगमेश्वर येथे आंदोलन छेडण्यात आले होते; मात्र त्यानंतर पुन्हा परिस्थिती जैसे थे असल्याचे दिसून येते.
महामार्गाचे काम सुरू असताना पर्यायी वाहतुकीसाठी जे मार्ग बनवले जातात ते सुस्थितीत बनवणे ही ठेकेदारांची जबाबदारी असताना असे होताना दिसत कां नाही? आरवली ते तळेकांटे प्रवास करताना जवळजवळ सर्वच पर्यायी मार्गाची दुरवस्था झाली आहे. या मार्गावरून प्रवास करताना वाहनचालकांना फार मोठा त्रास व नुकसान सोसावे लागत आहे. यामुळे अनेकवेळा लहान-मोठे अपघातही घडून येत आहेत; मात्र याकडे ठेकेदार जाणूनबुजून दुर्लक्ष करत असून चालढकल करत असल्याचे बोलले जात आहे. अशा मार्गांची तत्काळ दुरुस्ती व डांबरीकरण करून हा मार्ग प्रवासासाठी सुकर बनवावा अन्यथा लोकशाही पद्धतीने रस्त्यावर उतरून जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते मिलिंद चव्हाण यांनी दिला आहे.
--