
शिष्यवृत्ती परीक्षा सुरळीत आता वेध प्रज्ञाशोध आणि भास्कराचार्य परीक्षेचे
rat१४१७.txt
(टुडे पान २ साठी)
फोटो ओळी
-rat१४p९.JPG ः
८२६५४
दापोली ः नियोजन बैठकीत बोलताना गटशिक्षणाधिकारी अण्णासाहेब बळवंतराव.
---
दापोलीत गुणवत्ताधारकांचा टक्का वाढणार
अण्णासाहेब बळवंतराव ; प्रज्ञाशोध, भास्कराचार्य परीक्षेची तयारी
गावतळे, ता. १४ ः शिष्यवृत्ती परीक्षा सुरळीत पार पडल्या, आता वेध प्रज्ञाशोध आणि भास्कराचार्य परीक्षेचे आहेत. शिष्यवृत्तीमध्ये किमान ४० विद्यार्थी गुणवत्ताधारक होणार, निकालाचा टक्का वाढणार. तालुक्याचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यात व्हिजन दापोलीमुळे एक अचूक दृष्टी प्राप्त झाली आहे, असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी अण्णासाहेब बळवंतराव यांनी केले.
दापोली तालुका पंचायत समितीमार्फत पाचवर्षापासून व्हिजन दापोली उपक्रम राबविण्यात येत आहे. उपक्रमात पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षा आणि चौथीसाठी VDS४ परीक्षा म्हणजे गुणवंत विद्यार्थ्यांमधील अर्क शोधून त्यांची गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी गतवर्षी VDS४ मधून निवडलेल्या १०० विद्यार्थ्यांवर विशेष भर देऊन तालुक्यातील सर्व शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली आहे. १२ फेब्रुवारीला झालेल्या परीक्षेत पाचवीसाठी ११०७, तर आठवीसाठी ६९६ विद्यार्थी उपस्थित होते. पाण्यामधून वीज तयार होते; पण तिला गतीची गरज असते. ताकामधून लोणी मिळवण्यासाठी त्याला घुसळावे लागते अगदी तसेच परीक्षेतील यश मेहनतीवर अवलंबून असते. या उक्तीप्रमाणे परीक्षेच्या माध्यमातून आपले बुद्धिचातुर्य दाखवण्याचा प्रयत्न स्पर्धकांसह मार्गदर्शक आणि व्हिजन समितीने केला आहे. वर्षभर व्हिजन दापोलीच्या माध्यमातून सर्वांनी कार्यशाळा, मार्गदर्शन वर्ग, सराव चाचण्या, वैयक्तिक कोचिंग करून खूपच मेहनत घेतली असल्याचे गटशिक्षणाधिकारी यांनी सांगितले.
२१, २२ आणि २८ फेब्रुवारीला होणाऱ्या फक्त जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या मुलांमधून प्रज्ञावान आणि गणितामध्ये कोण होणार, भास्कराचार्य यासाठी आपला तालुका सज्ज असून त्या परीक्षांचे नियोजन तयार झाले आहे. प्रत्येक शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी यासाठी कसून तयारी करत आहेत.
----------------