माजी आमदार बाळ माने यांनी घेतली वारीशे कुटुंबीयांची भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माजी आमदार बाळ माने यांनी घेतली वारीशे कुटुंबीयांची भेट
माजी आमदार बाळ माने यांनी घेतली वारीशे कुटुंबीयांची भेट

माजी आमदार बाळ माने यांनी घेतली वारीशे कुटुंबीयांची भेट

sakal_logo
By

rat१४२१.txt

(टुडे पान २ साठी)

माजी आमदार माने यांच्याकडून वारिशे कुटुंबीयांचे सांत्वन

साखरपा, ता. १४ ः पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या कुटुंबीयांची माजी आमदार बाळ माने यांनी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. या भेटीदरम्यान माने यांनी कुटुंबीयांचे सांत्वन केले आणि धीर दिला.
रत्नागिरीचे माजी आमदार व भाजपा युवामोर्चाचे माजी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळ माने व माधवी माने यांनी कशेळी येथील ओवळीची वाडी येथील वारीशे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. अत्यंत साधी राहणी असणाऱ्या पत्रकार वारीशे यांची आर्थिक परिस्थिती बेताची होती. त्यांच्या पश्चात त्यांच्या मातोश्री व त्यांचा मुलगा असे दोघे आहेत. त्यांचा मुलगा यश रत्नागिरी येथील आयटीआय तंत्रनिकेतनमध्ये शिक्षण घेत असून त्याचे मातृछत्र यापूर्वीच हरपले होते. आता या दुर्दैवी घटनेमुळे त्याचे आई-वडील दोघेही हयात नाहीत. हा त्याच्या जीवनावर काळाने केलेला मोठा आघात आहे, असे माने यांनी सांगितले. वारीशे यांच्यासारख्या प्रामाणिक आणि निष्ठावंत पत्रकाराला सत्याचा सातत्याने पाठपुरावा केल्याने जीव गमवावा लागला आहे. याची दखल घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी या आणि अशा घटनांबाबत कठोर पावले उचलावीत यासाठी मी पत्रव्यवहार करणार आहे, असे माधवी माने यांनी सांगितले.