शिवजयंतीनिमित्त उद्या बांद्यात वक्तृत्व स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवजयंतीनिमित्त उद्या
बांद्यात वक्तृत्व स्पर्धा
शिवजयंतीनिमित्त उद्या बांद्यात वक्तृत्व स्पर्धा

शिवजयंतीनिमित्त उद्या बांद्यात वक्तृत्व स्पर्धा

sakal_logo
By

शिवजयंतीनिमित्त उद्या
बांद्यात वक्तृत्व स्पर्धा
बांदा, ता. १४ ः शिवजयंती सोहळ्याचे औचित्य साधून येथील श्री स्वराज्य प्रतिष्ठानच्यावतीने गुरुवारी (ता. १६) सावंतवाडी तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा येथील जिल्हा परिषद केंद्रशाळा नं. १ येथे होणार आहे.
स्पर्धा दुपारी ३ वाजता सुरू होणार आहे. पहिली ते चौथी या गटासाठी ''मला आवडलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा'' हा विषय असून यासाठी सादरीकरण वेळ ३ ते ५ मिनिटे आहे. पाचवी ते आठवी या गटासाठी ''छत्रपती शिवाजी महाराज एक कुशल संघटक'', किंवा ''धीरोदात्त राजा छत्रपती शिवाजी महाराज'' हे विषय ठेवण्यात आले असून सादरीकरण वेळ ५ ते ७ मिनिटे आहे. नववी ते बारावी गटासाठी ''छत्रपती शिवाजी महाराज यांचे अर्थकारण'' किंवा ''रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज'' हे विषय ठेवण्यात आले आहेत. यासाठी सादरीकरण वेळ ५ ते ७ मिनिटे आहे. खुल्या गटासाठी ''छत्रपती शिवाजी महाराज यांचे शेती आणि व्यापार विषयक धोरण'' किंवा ''छत्रपती शिवाजी महाराज द ग्रेट इंजिनियर'' हे विषय ठेवण्यात आले आहेत. यासाठी सादरीकरण वेळ ५ ते ७ मिनिटे आहे. यातील विजेत्यांना अनुक्रमे १०००, ७००, ५०० रुपये रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. दोन उत्तेजनार्थ विजेत्यांना रोख ५०० रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी भूषण सावंत, किंवा अक्षय मयेकर यांच्याशी संपर्क साधावा. विजेत्यांना १९ ला खेमराज प्रशाळेच्या मैदानावर होणाऱ्या मुख्य कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहे. जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी होण्याचे आवाहन श्री स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष नीलेश मोरजकर, उपाध्यक्ष केदार कणबर्गी, सचिव समीर परब, खजिनदार भूषण सावंत यांनी केले आहे.