Thur, March 23, 2023

वणव्यामुळे झाड कोसळून
तळेरे-कोल्हापूर मार्ग ठप्प
वणव्यामुळे झाड कोसळून तळेरे-कोल्हापूर मार्ग ठप्प
Published on : 14 February 2023, 11:21 am
82687
नाधवडे ः येथे वणव्यामुळे झाड कोसळल्याने वैभववाडी तळेरे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
वणव्यामुळे झाड कोसळून
तळेरे-कोल्हापूर मार्ग ठप्प
वैभववाडी, ता. १४ ः तालुक्यातील नाधवडे येथे वणव्यामुळे झाड कोसळून तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली.
नाधवडे येथे सोमवारी (ता.१३) सायंकाळी माळरानावर वणव्याचा भडका उडाला होता. या वणव्यात रस्त्यालगतचे झाड जळून रस्त्यावर कोसळले होते. या झाडाने संपूर्ण रस्ता व्यापल्याने वाहतूक ठप्प झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या घटनेची माहिती मिळताच पोलिस कर्मचारी राहुल पवार घटनास्थळी पोहोचले. त्यांनी स्थानिक ग्रामस्थ आणि वाहन चालकांच्या मदतीने रस्त्यावर कोसळलेले झाड बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.