पाडलोसमध्ये काजू कलमे खाक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाडलोसमध्ये काजू कलमे खाक
पाडलोसमध्ये काजू कलमे खाक

पाडलोसमध्ये काजू कलमे खाक

sakal_logo
By

८२७०७
टीपः swt१४१६.jpg मध्ये फोटो आहे.

पाडलोसमध्ये काजू कलमे खाक
लाखो रुपयांचे नुकसान; भरपाईसाठी पंचनामा करण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १४ ः पाडलोस-माडाचेगावळ येथील काजू बागायतदार तुकाराम गंगाराम गावडे यांच्या दोन एकरवरील काजू बागेस अचानक आग लागून ५२ काजू कलमे जळून खाक झाली. सहा वर्षांची उत्पन्न देणारी काजू कलमे जळाल्याने लाखोंचे नुकसान झाल्याचे उपस्थित काजू बागायतदार शेतकरी व तुकाराम गावडे यांनी सांगितले.
माडाचेगावळ येथे गावडे यांची दोन एकरवर काजू बागायत आहे. आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास काजू बागेमधून धूर येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ बागेजवळ धाव घेतली असता बागेला आग लागल्याचे दिसले. त्यांनी तत्काळ पाण्याच्या साहाय्याने एका बाजूची आग विझविली; मात्र आगीने रौद्ररुप धारण केल्यामुळे त्यांचे प्रयत्न तोकडे पडले. या आगीमुळे सहा वर्षांची काजू झाडे मोठी करण्यासाठी मजुरांसह केलेला इतर खर्च सर्व वाया गेला. पाडलोस उपसरपंच राजू शेटकर यांनी घटनास्थळी जात पाहणी केली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना पंचनामासाठी गावडे यांनी सांगितले की, कळवले परंतु कोणीही दखल घेतली नाही. उत्पन्न देणारी काजू कलमे जळाल्याने उदरनिर्वाहाचे साधन निर्माण झाले आहे. सद्यस्थितीत आपण दहा वर्षे मागे गेल्याचे श्री. गावडे यांनी उपसरपंच शेटकर यांना सांगितले. दोन दिवसांत पंचनामा न केल्यास अधिकाऱ्यांना कार्यालयात जात जाब विचारणार असल्याचा इशारा श्री. शेटकर यांनी दिला. आगीचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही.