ग्रामस्तरावर पोलिसपाटीलपद महत्वाचे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रामस्तरावर पोलिसपाटीलपद महत्वाचे
ग्रामस्तरावर पोलिसपाटीलपद महत्वाचे

ग्रामस्तरावर पोलिसपाटीलपद महत्वाचे

sakal_logo
By

rat१४१८.txt

बातमी क्र..१८ ( पान २ साठी)

फोटो ओळी
-rat१४p२२.jpg ः
८२७२३
राजापूर ः सेवानिवृत्त पोलिसपाटीलांच्या सत्कार समारंभात बोलताना प्रांताधिकारी वैशाली माने.
----
पोलिसपाटीलपद हा महत्वाचा घटक

वैशाली माने ; राजापुरात ३८ जणांचा सत्कार

राजापूर, ता. १४ ः महसूल आणि पोलिस विभागाशी निगडित असलेले पोलिस पाटील हे पद ग्रामस्तरावरचा महत्वाचा घटक आहे. पोलिसपाटील पदाला अनन्यसाधारण महत्व असून त्यांनी ग्रामस्तरावर काम करताना निःपक्षपातीपणे काम करावे, असे प्रतिपादन प्रांताधिकारी वैशाली माने यांनी केले.
महाराष्ट्र राज्य पोलिसपाटील महासंघाच्या राजापूर शाखेतर्फे सेवानिवृत्त पोलिसपाटलांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. नगर वाचनालयाच्या सभागृहामध्ये हा कार्यक्रम झाला. या वेळी पोलिसपाटील संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पुजारी, पोलिस उपनिरीक्षक शिल्पा वेंगुर्लेकर, संघटनेच्या उपाध्यक्ष अनुजा झोरे, सचिव मधुकर सुतार, सेवानिवृत्त पोलिसपाटील गजानन पवार, संदीप परटवलकर आदी उपस्थित होते. तालुक्यातील रिक्त असलेली पोलिसपाटलांची पदे भरण्याच्यादृष्टीने प्रशासकीय स्तरावर कार्यवाही सुरू असल्याची माहिती माने यांनी दिली. या वेळी सेवानिवृत्त झालेल्या ३८ पोलिसपाटलांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रांताधिकारी माने म्हणाल्या, पोलिसपाटील काम करताना शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य महत्वाचे असून त्या दृष्टीने सार्‍यांनी योग्य ती काळजी घ्यावी. भविष्यामध्ये अडचणीत येणार नाही याची पोलिसपाटलांनी काम करताना योग्य ती दक्षता घ्यावी. शिल्पा वेंगुर्लेकर यांनी गावागावामधील शांतता आणि सुव्यवस्था राखण्यामध्ये पोलिसपाटलांचे सहकार्य महत्वपूर्ण ठरल्याचे सांगताना कामकाजासंबंधी सांगितले. या वेळी सेवानिवृत्त पोलिसपाटील पवार, पोलिसपाटील संघटनेचे अध्यक्ष पुजारे यांनी मार्गदर्शन केले.