कणकवली : पोलीस क्रिकेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवली : पोलीस क्रिकेट
कणकवली : पोलीस क्रिकेट

कणकवली : पोलीस क्रिकेट

sakal_logo
By

82749

क्रिकेट स्पर्धेत वैभववाडी संघ विजेता

जिल्‍हा पोलिस दलातर्फे आयोजन; मोटार परिवहन संघ उपविजेता

कणकवली, ता. १४ : सिंधुदुर्ग पोलिस दलाच्या क्रिकेट स्पर्धेत वैभववाडी पोलिस ठाणे संघ विजेता तर मोटार परिवहन विभागाचा संघ उपविजेता ठरला. पोलिस परेड मैदान येथे दोन दिवस स्पर्धा झाल्‍या. मानव संसाधन शाखा व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सिंधुदुर्ग यांनी संयुक्‍तपणे स्पर्धेचे आयोजन केले होते. यात जिल्ह्यातील पोलिस विभागातील २२ संघांनी सहभाग घेतला होता.
सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस दलातील पोलिस अधिकारी, अंमलदार, मंत्रालयीन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग असलेल्‍या नाईट अंडर आर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेमध्ये अंतिम सामन्याचा सामनावीर म्‍हणून गणेश भोवड (वैभववाडी पोलिस ठाणे), मालिकावीर अभिजित तावडे (वैभववाडी), उत्कृष्ट गोलंदाज भालचंद्र दाभोलकर (मोटार परिवहन विभाग, सिंधुदुर्ग), उत्कृष्ट फलंदाज अमित निब्रे (मोटार परिवहन विभाग, सिंधुदुर्ग) यांची निवड करून सन्मानचिन्ह आणि चषक देण्यात आला.
सिंधुदुर्ग पोलिस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना रोजच्या दैनंदिन ताण तणावापासून विरंगुळा मिळावा, सुसंवाद व्हावा, एकोपा निर्माण व्हावा, खिलाडू वृत्ती व कौशल्यला वाव मिळावा, खेळाची भावना निर्माण व्हावी यासाठी पोलिस अधिकारी व अंमलदार, तसेच मंत्रालयीन अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी पोलिस अधीक्षक, सौरभ कुमार अग्रवाल यांच्या संकल्पनेतून व नितिन बगाटे, अपर पोलिस अधीक्षक, सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली नाईट अंडर आर्म बॉक्स क्रिकेट झाली. स्पर्धेत पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनीही सहभाग घेतला होता. स्पर्धेमध्ये २२ संघांतील १७६ खेळाडू सहभागी झाले होते. २२ महिला संघांनीही या स्पर्धेत सहभाग घेतला होता.