
बांद्यात सोने तपासणी मशिन
82746
बांदा ः येथे उपलब्ध केलेली सोने तपासणी मशिन.
बांद्यात सोने तपासणी मशिन
बांदा ः खोट्या सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक थांबावी व सोन्याच्या दागिन्यांची योग्य पारख करण्यासाठी बांदा शहरात प्रथमच येथील श्री भवानी सहकारी पतसंस्थेने सोने तपासणी मशिन संस्थेच्या मुख्य कार्यालयात उपलब्ध केली आहे. या मशिनचे उद्घाटन गुरुवारी (ता. १६) सकाळी साडेदहाला होणार आहे. सध्याच्या काळात खोटे दागिने बँकेत ठेवून पैसे उकळण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे संस्थेने शहरात प्रथमच सोने तपासणी मशिन घेण्याचा निर्णय घेतला. या मशिनचे उदघाट्न सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, सरपंच प्रियांका नाईक, दैनिक ''सकाळ''चे बांदा प्रतिनिधी नीलेश मोरजकर यांच्या उपस्थितीत होणार आहे. बँकेचे ग्राहक, हितचिंतक, ग्रामस्थ यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष वालेतीन आल्मेडा, उपाध्यक्ष राजेंद्र वाळके, व्यवस्थापक शेखर गवस व संचालक मंडळाने केले आहे. या मशिनच्या माध्यमातून घडविलेल्या दागिन्यात किती प्रमाणात सोने, तांबे, चांदी आहे, याची सविस्तर माहिती टक्केवारीत मिळणार आहे. यामुळे सोन्याच्या दागिन्यांची योग्य किंमत ठरविण्यास मदत होणार आहे.