कलंबिस्तला आजपासून दशावतार नाट्य महोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कलंबिस्तला आजपासून
दशावतार नाट्य महोत्सव
कलंबिस्तला आजपासून दशावतार नाट्य महोत्सव

कलंबिस्तला आजपासून दशावतार नाट्य महोत्सव

sakal_logo
By

कलंबिस्तला आजपासून
दशावतार नाट्य महोत्सव
सावंतवाडी, ता. १४ ः कलंबिस्त येथील हनुमान दशावतार नाट्यमंडळ व ग्रामस्थांच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त १५ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत दशावतार नाट्य महोत्सवाचे आयोजन तेथील श्री लिंगेश्वर मंदिर येथे केले आहे. नाट्य महोत्सवाचे उद्या (ता. १५) सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे. ७ वाजता आरोलकर दशावतार नाट्यमंडळाचे ‘शिवभक्ती महिमा’ १६ ला जय हनुमान दशावतार नाट्यमंडळ, आरोस यांचे ‘शिव महाकाल’, १७ ला हेळेकर दशावतार नाट्यमंडळ, कारिवडे यांचे ‘एक डाव नागिणीचा’, १८ ला खानोलकर दशावतार नाट्यमंडळाचे ‘दीप माझा वंशाचा’ आणि १९ ला नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्यमंडळाचा ‘पद पदना’ हा नाट्यप्रयोग होणार आहे. महाशिवरात्री दिवशी शनिवारी दुपारी चार वाजता अंकुश सांगेलकर यांचा संगीत, भक्तिगीत, नाट्यगीत गायनाचा कार्यक्रम होणार आहे. भाविकांनी कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.