
राजापूर-कुत्र्याच्या हल्ल्यात दहा वर्षाची मुलगी जखमी
rat१४५१.txt
(पान ३ साठी)
शाळकरी मुलीवर कुत्र्याच्या हल्ला
राजापूर, ता. १४ : गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा शहरामध्ये भटक्या कुत्र्यांचा उपद्रव सुरू झाला आहे. आज (ता. १४) कोंढेतड येथील एका दहा वर्षीय मुलीवर भटक्या कुत्र्याने हल्ला करून तिला जखमी केले. यापूर्वी नगर पालिकेने भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्याची मोहिमही राबविली. मात्र तरीही शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या कमी झालेली दिसत नाही. कोंढेतड येथील एका दहा वर्षीय मुलीच्या पायाला कुत्र्याने चावा घेतल्याने गंभीर दुखापत झाली आहे. मनसेचे शहराध्यक्ष आजीम जैतापकर यांनी मुलीला तत्काळ राजापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेमुळे कोंढेतड परिसरातील ग्रामस्थ भयभीत झाले असून या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. शहरामध्ये ठिकठिकाणी भटक्या कुत्र्यांची टोळकी फिरताना दिसत आहेत. या कुत्र्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी मनसेचे शहराध्यक्ष श्री. जैतापकर यांनी केली आहे.