
चिपळूण-गोवळकोटमधील गाळासाठी लॉंग रिच बूम दाखल
rat१४५३.txt
बातमी क्र. ५३ (पान ३ साठी)
फोटो ओळी
-ratchl१४५.jpg-
८२८००
चिपळूण ः गाळ काढण्यासाठी दाखल झालेली नाम फाऊंडेशनची यंत्रणा.
-----
गोवळकोटमध्ये अत्याधुनिक यंत्रणा दाखल
नामचा पुढाकार ; पहिल्या टप्प्यातील गाळ उपशाला येणार वेग
चिपळूण, ता. १४ ः गेल्या महिनाभरापासून वाशिष्ठी नदीपात्रातील गाळ उपशाचे काम जलसंपदा विभागाकडून सुरू होते. मात्र अपुऱ्या यंत्रणेमुळे या कामाला गती मिळत नव्हती. चिपळूण बचाव समितीने याविषयी उघडपणे आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. याबाबत मंत्रालय स्तरावर झालेल्या बैठकीत पहिल्या टप्प्यातील गाळ उपशाची जबाबदारी स्वrकारली होती. त्याप्रमाणे नामची यंत्रणा येथे दाखल झाली असून बुधवारपासून (ता. १५) गाळ उपशाला सुरवात होणार आहे. त्यासाठी लॉंग रिच बुम व अन्य अत्याधुनिक यंत्रणा आणली आहे.
मुंबई येथे ६ फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक झाली. वाशिष्ठीच्या पहिल्या टप्प्यातील गाळ उपशाकरीता आतापर्यंत नाम फाउंडेशन तर्फे पाच पोकलेन चिपळूणमध्ये दाखल झाले आहेत. गोवळकोट येथील नदीपात्रातील गाळ काढण्यासाठी लॉन्ग रिच बूम असलेला पोकलेन मंगळवारी दाखल झाला आहे. पाच पोकलेनसह गाळ काढण्याचे काम बुधवारपासून सुरू होणार आहे. गाळ काढण्याच्या कामाला प्रत्यक्ष गती मिळण्यासाठी प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी प्रशासकीय अधिकारी व बचाव समिती सदस्यासमवेत संयुक्त बैठक घेतली. या कामासाठी जलसंपदा विभागाने डिझेल देण्याचे नियोजन केले आहे. पहिल्या टप्प्यातील उर्वरित कामासाठी उक्ताड, गोवळकोट आणि बाजार पुलाजवळील गणेश विसर्जन घाट या तिन्ही ठिकाणी एकाच वेळी मशिनरी सुरू होणार आहे. नाम फाउंडेशनचे मल्हार पाटेकर बुधवारी चिपळुणात दाखल होत आहेत.