
बाबूराव जोशी गुरूकुलमध्ये पालकांची शाळा उपक्रम उत्साहात
rat१५१८.txt
बातमी क्र.. १८ (टुडे पान ४ साठी)
फोटो ओळी
-rat१५p१०.jpg-
८२९०९
रत्नागिरी ः मार्गदर्शन करताना उल्का पुरोहित. शेजारी किरण सनगरे, किरण जोशी, संतोष पुरोहित, अॅड. प्रिया लोवलेकर आदी.
---
बाबुराव जोशी गुरूकुलात पालकांची शाळा
रत्नागिरी, ता. १५ ः येथील जीजीपीएस शाळेच्या (कै.) बाबुराव जोशी पंचकोशाधारित गुरूकुल प्रकल्प आणि रा. भा. शिर्के प्रशालेच्या (कै.) नानल गुरूकुल प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने पालकांची शाळा उपक्रमाचे आयोजन जोशी गुरूकुलमध्ये करण्यात आले. या उपक्रमामध्ये गुरूकुलचे ७० पालक सहभागी झाले.
शाळेची सुरवात सकाळी राष्ट्रगीत, उपासनेने झाली. त्यानंतर सूर्यनमस्कार योगाभ्यास झाला. पालकांची शाळा या उपक्रमाचे उद्घाटन राष्ट्रीय बाल आणि महिलाकल्याण केंद्राच्या प्रमुख अॅड. प्रिया लोवलेकर यांच्या हस्ते झाले. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून विद्युत महामंडळाचे (मुंबई) जनसंपर्क प्रमुख संतोष पुरोहित, उल्का पुरोहित, गुरूकुल प्रकल्पप्रमुख किरण जोशी, किरण सनगरे यांच्या उपस्थितीत झाले. कार्यक्रमात प्रसारमाध्यमे, मोबाईल आणि विद्यार्थी या प्रमुख मुद्द्यांवर त्याचे परिणाम व दुष्परिणाम यावर संतोष पुरोहित यांनी पालक, शिक्षक यांच्याशी चर्चात्मक सत्र घेतले. या वेळी अॅड. बाबासाहेब नानल गुरूकुल प्रकल्पाचे चेअरमन सीए उमेश लोवलेकर उपस्थित होते.