बांदा येथे २ मार्चला एकपात्री अभिनय स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बांदा येथे २ मार्चला
एकपात्री अभिनय स्पर्धा
बांदा येथे २ मार्चला एकपात्री अभिनय स्पर्धा

बांदा येथे २ मार्चला एकपात्री अभिनय स्पर्धा

sakal_logo
By

बांदा येथे २ मार्चला
एकपात्री अभिनय स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १५ ः शिक्षण प्रसारक मंडळ बांदा संचलित येथील गोगटे-वाळके कॉलेज बांदा आणि चंद्राबाई कलाप्पा म्हेत्री मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट हलकर्णी (ता. गडहिंग्लज) कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने खुल्या पातळीवर एकपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन २ मार्चला सकाळी नऊला महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात केले आहे.
या स्पर्धेसाठी पाच हजार रुपये व आकर्षक प्रशस्तीपत्र (चंद्राबाई कलाप्पा म्हेत्री यांच्या स्मरणार्थ प्रा. डॉ. किशोर म्हेत्री पुरस्कृत), तीन हजार रुपये व प्रशस्तीपत्र (शालन उर्फ ताई आनंदा शिर्के यांच्या स्मरणात प्रा. अनिल शिर्के पुरस्कृत), पंधराशे रुपये व प्रशस्तीपत्र (यशोदाबाई सीताराम गावडे यांच्या स्मरणात प्रा. रमाकांत गावडे पुरस्कृत), अशी प्रथम तीन, तर उत्तेजनार्थ एक हजार रुपये व प्रशस्तीपत्र (चंद्रकांत कांबळे यांच्या स्मरणार्थ मुकुंद कांबळे पुरस्कृत) देण्यात येणार आहे. सांस्कृतिक आदान-प्रदानता व्हावी, बुजुर्गांसह नवोदितांना हक्काचा रंगमंच उपलब्ध व्हावा, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेत १० वर्षांनंतरची कोणतीही व्यक्ती सहभागी होऊ शकते. किमान सात मिनिटे व कमाल दहा मिनिटापर्यंत एका कलावंताला सादरीकरण करता येईल. ही स्पर्धा मराठी भाषेत होईल. स्पर्धेबाबत इतर नियम व अटी स्पर्धेच्या वेळी सांगण्यात येतील. या क्षेत्रातील तज्ज्ञांतर्फे स्पर्धेचे परीक्षण होणार आहे. जास्तीत जास्त कलावंतानी स्पर्धेत सहभाग घ्यावा, अधिक माहितीसाठी संयोजन समितीचे प्रा. आर. एस. गावडे, प्रा. अनिल शिर्के येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर व ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. डॉ. किशोर म्हेत्री यांनी केले आहे.