डॉ. रुपेश पाटकर यांना नेरूरकर साहित्य पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. रुपेश पाटकर यांना
नेरूरकर साहित्य पुरस्कार
डॉ. रुपेश पाटकर यांना नेरूरकर साहित्य पुरस्कार

डॉ. रुपेश पाटकर यांना नेरूरकर साहित्य पुरस्कार

sakal_logo
By

82974
बांदा ः येथील नट वाचनालयात डॉ. रुपेश पाटकर यांना सन्मानित करताना एस. आर. सावंत. सोबत प्रकाश पाणदरे, पुष्पा वालावलकर आदी. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)

डॉ. रुपेश पाटकर यांना
नेरूरकर साहित्य पुरस्कार
बांदा, ता. १५ ः नट वाचनालय, बांदा यांच्याकडून दिला जाणारा प्र. श्री. नेरूरकर साहित्य पुरस्कार प्रसिद्ध मनसोपचारतज्ज्ञ साहित्यिक डॉ. रुपेश पाटकर यांना प्र. श्री. नेरूरकर यांच्या जयंतीदिनी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी व्यासपिठावर वाचनालयचे अध्यक्ष एस. आर. सावंत, सचिव राकेश केसरकर, ज्येष्ठ नागरिक संघांचे अध्यक्ष अन्वर खान, प्रकाश पाणदरे, सहसचिव हेमंत मोर्ये, संचालक निलेश मोरजकर, शंकर नार्वेकर, सौ. स्वप्नीता सावंत, नेरुरकर यांच्या भगिनी पुष्पा वालावलकर आदी उपस्थित होते.
पेशाने मनोविकारतज्ज्ञ असलेले डॉ. पाटकर हे वीस वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी समाजातील वंचित घटकांच्या विकासासाठी सातत्याने योगदान दिले आहे. मानसिक आजार असलेल्या व्यक्तींना मोफत उपचार देण्यासोबतच पर्यावरण रक्षण, कामगारांचे प्रश्न, कुमारवयीन मुलांच्या समस्या याबाबत भरीव योगदान देत आहेत. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. राकेश केसरकर यांनी सूत्रसंचालन केले.