मत्स्यसंवर्धकांचा समावेश ‘सिंधुरत्न समृद्ध’मध्ये करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मत्स्यसंवर्धकांचा समावेश 
‘सिंधुरत्न समृद्ध’मध्ये करा
मत्स्यसंवर्धकांचा समावेश ‘सिंधुरत्न समृद्ध’मध्ये करा

मत्स्यसंवर्धकांचा समावेश ‘सिंधुरत्न समृद्ध’मध्ये करा

sakal_logo
By

मत्स्यसंवर्धकांचा समावेश
‘सिंधुरत्न समृद्ध’मध्ये करा

रविकिरण तोरसकर; पालकमंत्र्यांना निवेदन

मालवण, ता. १५ : सिंधुरत्न समृद्ध योजनेमध्ये मत्स्य शेतकरी तथा मत्स्यसंवर्धक यांचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी आत्मनिर्भर मत्स्य शेतकरी संघटनेचे समन्वयक रविकिरण तोरसकर यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शासनाने सिंधुदुर्ग व रत्नागिरी या दोन जिल्ह्यांमध्ये नैसर्गिक साधन सामग्रीवर आधारीत पर्यटन, मत्स्यव्यवसाय व सूक्ष्म उद्योगांचा विकास करण्यासाठी ‘सिंधुरत्न समृद्ध’ ही पथदर्शी योजना २०२२ ते २०२५ या तीन वर्षांसाठी राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेंतर्गत मत्स्यव्यवसाय या विषयात विविध योजना जाहीर केल्या आहेत; परंतु सिंधुरत्न योजनेंतर्गत जाहीर केलेल्या योजनांमध्ये मत्स्यसंवर्धन व आनुषंगिक गोष्टींसाठी योजनांचा समाविष्ट केलेला नाही. फक्त पिंजरा संवर्धनाचे बळकटीकरण या एकाच गोष्टीचा समावेश केलेला आहे. त्यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मत्स्यसंवर्धनास बळकटी देण्यासाठी मत्स्यसंवर्धन संबंधित योजनांचा समावेश करावा. मत्स्य शेतकऱ्यांसाठी इन्सुलिटेड वाहन, मत्स्य खाद्य अनुदान योजना, मत्स्य बीज खरेदी, शेततळ्यातील मत्स्यशेती उपयुक्त निविष्ठा अनुदान, शोभिवंत मत्स्यपालन यांचा समावेश करावा. मत्स्यपालन या व्यवसायातून नीलक्रांतीच्या दिशेने पाऊल टाकण्यासाठी आज मत्स्यशेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारच्या खंबीर पाठिंब्याची गरज आहे. मत्स्य शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी सिंधुरत्न समृद्ध योजनेमध्ये मत्स्यशेती अथवा मत्स्यसंवर्धन या व्यवसाय संबंधित गोष्टींचा समावेश करावा, अशी मागणीही तोरसकर यांनी केली आहे.