तळेरेत रंगला ‘गीत-वीर विनायक’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तळेरेत रंगला ‘गीत-वीर विनायक’
तळेरेत रंगला ‘गीत-वीर विनायक’

तळेरेत रंगला ‘गीत-वीर विनायक’

sakal_logo
By

82984
तळेरे ः हायस्कूलमध्ये सतीश भिडे यांनी ‘गीत-वीर विनायक’ हा सांगितिक कार्यक्रम सादर केला. (छायाचित्र ः एन. पावसकर)

तळेरेत रंगला ‘गीत-वीर विनायक’
तळेरे, ता. १५ ः समाजातून अंधश्रद्धा, जातीयता नष्ट होऊन समाजामध्ये एकात्मतेचे, समतेचे राज्य यावे, या उद्देशाने देश-परदेशातही लोकप्रिय ठरलेले मुंबई येथील सतीश भिडे यांचा ‘गीत-वीर विनायक’ हा कार्यक्रम येथील वामनराव महाडिक माध्यमिक महाविद्यालयात झाला. यावेळी सतीश भिडे यांनी स्वा. सावरकर यांच्या जीवनातील विविध प्रसंगाचे संगीतमय कार्यक्रम सादर केला. रोपट्यास पाणी घालून कार्यक्रमाला प्रारंभ झाला. श्री. भिडे व पत्रकार परेश राऊत यांचे स्वागत प्राचार्य अविनाश मांजरेकर यांनी केले. भिडे हे १९८२ पासून गेली सुमारे ४० वर्षे स्वा. सावरकर यांच्या जीवनावर आधारित गीत गायनाचा कार्यक्रम करीत आहेत. आतापर्यंत भारत व भारताबाहेर मिळून २९०८ एवढे त्यांचे कार्यक्रम झाले आहेत. या कार्यक्रमासाठी ते कोणत्याही प्रकारचे मानधन घेत नसून आग्रहास्तव प्राप्त झालेला निधी यांच्याकडून सैनिक स्कूलला देणगी रूपाने मदत म्हणून दिला जातो. १९१७ मध्ये दुबई येथे इंडियन स्पोर्ट क्लबच्या वतीने झालेल्या त्यांच्या कार्यक्रमास तत्कालीन भारताचे वाणिज्य दूत चोको उपस्थित होते. आकाशवाणी व दूरदर्शनवर देखील त्यांचे कार्यक्रम सादर झालेले आहेत. स्वा. सावरकरांच्या जीवनावरील काही प्रसंग कथन करीत तसेच त्यांनी लिहिलेल्या काही गीतांचे गायन केले. या कार्यक्रमात तक्षिल तळेकर, नमित मेस्त्री, आयुष तळेकर, आर्या घाडी, प्रशालेचा माजी विद्यार्थी साईश खटावकर विद्यालयाच्या सहाय्यक शिक्षिका संस्कृती पडवळ यांनी सांगितिक साथ दिली. पत्रकार राऊत यांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम झाला.