सात्विक, समर्पणाची भावनेने सामाजिक प्रश्न सुटतील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सात्विक, समर्पणाची भावनेने सामाजिक प्रश्न सुटतील
सात्विक, समर्पणाची भावनेने सामाजिक प्रश्न सुटतील

सात्विक, समर्पणाची भावनेने सामाजिक प्रश्न सुटतील

sakal_logo
By

rat१५२४.txt

बातमी क्र..२४ (पान २ साठी)

फोटो ओळी
-Rat१५p१२.jpg ः
८२९२९
मंडणगड ः कार्यक्रमात सत्कार कार्यक्रमांत बोलताना कर्मवीर दादा इदाते.
--
सात्विक, समर्पणाची भावना महत्वाची

पद्मश्री कर्मवीर दादा इदाते ; मंडणगडमध्ये नागरी सत्कार

मंडणगड, ता. १६ ः आपल्या समाजाप्रती सात्विक व समर्पणाची भावना असेल तरच समाजाचे सर्व प्रश्न सुटतील व समाजाची सर्वांगीण उन्नती होईल. ज्या ज्या ठिकाणी समाजासाठी काम करण्याची संधी मिळाली त्या ठिकाणी याच भावनेने कार्यरत राहिलो, असे प्रतिपादन पद्मश्री पुरस्कारप्राप्त कर्मवीर दादा इदाते यांनी केले.
लोकनेते गोपीनाथजी मुंडे महाविद्यालयात मंडणगड शहर व्यापारी संघटनेच्यावतीने आयोजित नागरी सन्मान सोहळ्यात बोलत होते. ते म्हणाले, माझे गुरूवर्य गोपाळराव भागवत यांच्या प्रेरणेने मी १९७० ला सर्वप्रथम मंडणगड येथे आलो. तेव्हापासून आजपर्यंत मंडणगडशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित झाले आहेत. पुढे या ठिकाणी रामभाई लेंढे, रामशेठ कोकाटे, विजयभाई मेहता, प्रमोद काटकर, दळवी, मधुकर मर्चंडे यांच्यासारखी मोठ्या मनाची सर्वपक्षीय कितीतरी माणसे भेटली. या सर्वांच्या सहकार्यातूनच मंडणगड व परिसरात सावित्रीबाई फुले शिक्षणसंस्थेच्या माध्यमातून उपेक्षित समाजाच्या व अन्य शैक्षणिक संस्थांच्या विकासासाठी काम करण्याची मला संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. तत्त्वांशी कधीही तडतोड न करता आपण या समाजाचे एक घटक आहोत, असे समजून शक्य त्या सर्व प्रकारची मदत करत राहिलो. असे सांगून त्यांनी सत्कार केल्याबद्दल सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. या वेळी लोकनेते गोपीनाथजी मुंडे महाविद्यालय, मंडणगड, हुतात्मा तुकाराम बबन भोईटे विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय कुंबळे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक विद्यामंदिर आंबडवे, राजे प्रतिष्ठान मंडणगड, मंडणगड तालुका पत्रकार संघ, छत्रपती शिवाजी विद्यालय सोवेली, ज्ञानगंगा इंग्लिश मीडियम स्कूल मंडणगड, जय भवानी मराठा पतसंस्था मंडणगड, मंडणगड पोलिस ठाणे महिला दक्षता समिती, दापोली अर्बन बॅंक शाखा मंडणगड आदी संस्थांच्यावतीने कर्मवीर दादा इदाते यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
या वेळी मंडणगड शहर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रमोद काटकर, उपाध्यक्ष नीलेश गोवळे, संस्थेचे सहकार्यवाह विश्वदास लोखंडे, सुनील मेहता, उपनगराध्यक्ष वैभव कोकाटे, संतोष चव्हाण, विजय आंब्रे, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. राहुल जाधव, नगरसेवक विनोद जाधव, अर्जुन भोसले, दीपक घोसाळकर, प्रकाश शिगवण आदी उपस्थित होते.