भोसले फार्मसीत राष्ट्रीय परिषद
भोसले फार्मसीत राष्ट्रीय परिषद

भोसले फार्मसीत राष्ट्रीय परिषद भोसले फार्मसीत राष्ट्रीय परिषद

82997
सावंतवाडी : राष्ट्रीय परिषदेच्या उद्‍घाटन प्रसंगी डॉ. राजेश नवांगुळ, प्राचार्य डॉ. कृष्णा अय्यर, डॉ. शैलेंद्र गुरव आदी.

भोसले फार्मसीत राष्ट्रीय परिषद

सलग पाच वर्षे आयोजन; सहा राज्यातील अध्यापकांसह विद्यार्थी

सावंतवाडी, ता. १५ ः येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी येथे ‘वैद्यकीय आणि औषध निर्माण शास्त्रातील विज्ञान’ या विषयावरची राष्ट्रीय परिषद पार पडली. कॉलेजने सलग पाचव्या वर्षी राष्ट्रीयस्तरावरची परिषद आयोजित करून आपली ओळख ठळकपणे अधोरेखित केली.
परिषदेचे उद्‍घाटन येथील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. राजेश नवांगुळ यांच्या हस्ते झाले. व्यासपीठावर प्रमुख मार्गदर्शक बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. कृष्णा अय्यर, गोवा कॉलेज ऑफ फार्मसीचे विभाग प्रमुख डॉ. शैलेंद्र गुरव, यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीचे सचिव संजीव देसाई, प्राचार्य डॉ. विजय जगताप उपस्थित होते. या परिषदेमध्ये महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, मध्यप्रदेश, राजस्थान व गुजरात या राज्यांतून ७५० पेक्षा जास्त विद्यार्थी व अध्यापक सहभागी झाले होते.
डॉ. नवांगुळ यांनी वैद्यकीय क्षेत्र आणि औषधनिर्माणशास्त्र यांच्यामधील परस्परावलंबनाची माहिती दिली. त्याचप्रमाणे पारंपरिक वनौषधींवर संशोधन करून त्यांचा आधुनिक वैद्यक शास्त्रात समावेश करण्याला चालना द्यायला हवी, असेही मत व्यक्त केले. डॉ. जगताप यांनी ‘औषधनिर्माण शास्त्रातील विविध संधी’ यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. तुषार रुकारी यांनी मागील चार वर्षांत पार पडलेल्या परिषदांचा आढावा घेत अशा परिषदा आयोजित करण्याचे महत्त्व सांगितले. दुपारच्या सत्रात डॉ. अय्यर यांनी ‘सायटोक्रोम पी-४५०’ या जैव उत्प्रेरकाचे फार्माकोकायनेटिक्स आणि चयापचय क्रिया यामधील महत्त्व विशद केले. डॉ. गुरव यांनी आयुर्वेद व जीवशास्त्र यांचा आरोग्य व्यवस्थापनातील एकात्मिक दृष्टिकोन स्पष्ट करत आयुर्वेदातील एक महत्त्वपूर्ण औषधी ‘घृता’चे महत्त्व सांगितले.
सायंकाळच्या सत्रात शंभरपेक्षा जास्त शोधनिबंधपर भित्तीपत्रकांचे सादरीकरण करण्यात आले. त्यांचे परीक्षण करून उत्कृष्ट सादरीकरणाला प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व रोख बक्षिसे देण्यात आली. यामध्ये पदविका विभागातून प्रथम हर्षल सूर्यवंशी (यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ डी. फार्मसी), द्वितीय आकाश चव्हाण (दादासाहेब चव्हाण मेमोरियल फार्मसी कॉलेज माळवाडी-कराड), तृतीय सुचिता कांडरकर (यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी) यांना गौरविण्यात आले. पदवी विभागातून प्रथम गौरव भावे (इंदिरा इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी, सडवली ता. संगमेश्वर), द्वितीय विनिती महाले (सर डॉ. एम. एस. गोसावी फार्मसी कॉलेज, नाशिक), तृतीय नम्रता घाडी (यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी) यांना देण्यात आले. पदव्युत्तर विभागातून अस्मिता लोधी (महाराष्ट्र इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, पुणे), मृणाली कंटक (गोवा कॉलेज ऑफ फार्मसी, पणजी), तर उत्तेजनार्थ जतीन टेकावडे (यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी) यांना गौरविण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गौरी भिवशेठ यांनी केले. परिषद यशस्वी होण्यासाठी डॉ. रोहन बारसे, डॉ. प्रशांत माळी, प्रा. विनोद मुळे, प्रा. रश्मी महाबळ, डी.फार्मसी प्राचार्य सत्यजित साठे, प्रा. ओंकार पेंडसे यांनी मेहनत घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com