आग आटोक्‍यात आणल्याने बांधकरवाडीत धोका टळला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आग आटोक्‍यात आणल्याने
बांधकरवाडीत धोका टळला
आग आटोक्‍यात आणल्याने बांधकरवाडीत धोका टळला

आग आटोक्‍यात आणल्याने बांधकरवाडीत धोका टळला

sakal_logo
By

83009
कणकवली : शहरातील शाळा क्रं.२ च्या परिसरात लागलेली आग नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी आटोक्‍यात आणली. (छायाचित्र : प्रथमेश जाधव)

आग आटोक्‍यात आणल्याने
बांधकरवाडीत धोका टळला

कणकवली, ता.१५ : शहरातील बांधकरवाडी येथील शाळा नं २ परिसरात दुपारी सव्वा बाराच्या सुमारास आग लागली होती. नगरपंचायतीच्या अग्नीशमन बंबाच्या साहाय्याने ही आग तातडीने नियंत्रणात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
बांधकरवाडी येथील शाळा क्र.२ च्या मागील बाजूस कचरा जाळण्यासाठी आग लावली होती. यावेळी जोरदार वारा सुटल्‍याने ही आग तेथील परिसरात पसरली. शिक्षकांनी याबाबतची माहिती नगरसेवक अभिजित मुसळे यांना दिली. तर मुसळे यांनी तातडीने अग्निशमन बंब शाळेकडे पाठवला आणि स्वत:ही नगरपंचायत कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. या आगीमुळे शाळेच्या मागील बाजूची झाडे जळाली; मात्र दहा मिनिटांत अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाल्‍याने आग नियंत्रणात आली. अन्यथा जोरदार वाऱ्यामुळे शाळेची इमारत तसेच लगतच्या घरांनाही धोका होता.