
जिल्ह्यातील 16 चेकपोस्ट करणार बंद
rat१५२९.txt
(पान ३ साठी, अॅंकर)
जिल्ह्यातील १६ चेकपोस्ट होणार बंद
४० कर्मचारी उपलब्ध ; अचानक तपासणी मोहीम
रत्नागिरी, ता. १५ ः जिल्हा पोलिसदलावर कमी मनुष्यबळामुळे प्रचंड ताण पडत आहे. त्यात सुमारे ४० कर्मचारी जिल्ह्यातील १६ चेकपोस्टवर विनाकारण गुंतून राहतात. पोलिसदलाच्या कामकाजामध्ये त्याचा फारसा फायदा होत नाही, म्हणून जिल्ह्यातील १६ चेकपोस्ट बंद करण्याचा निर्णय जिल्हा पोलिसदलाने घेतला आहे; परंतु ही तपासणी नाकी कायमची बंद न ठेवता आलटून पालटून अचानक सुरू करून तपासणी केली जाणार आहे. अचानक तपासणीमुळे गुन्हे उकलण्याच्यादृष्टीने फायदा होणार आहे.
जिल्ह्याची १७ लाखाच्या वर लोकसंख्या असली तरी पोलिसदलाची संख्या १६०० देखील नाही. सुमारे १ हजार १०० लोकांमागे १ पोलिस कर्मचारी अशी पोलिसदलाच्या मनुष्यबळाची स्थिती आहे. त्यात मोर्चे, बंदोबस्त, आंदोलन त्यात गुन्हे तपास आदींमध्ये पोलिस कर्मचाऱ्यांची विभागणी होते. अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे कर्मचाऱ्यांना १२ ते २४ तास ड्युटी करावी लागत आहे. त्याला सागरी सुरक्षेच्यादृष्टीने आणि महत्वाच्या ठिकाणी जिल्ह्यात १६ चेकपोस्ट आहेत. या तपासणी नाक्यावर दोन्ही सत्रांमध्ये दोन ते चार कर्मचारी कार्यरत असतात. वाढते गुन्हे आणि वाढत्या लोकसंख्येचा विचार करून जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी जिल्ह्याचा आढावा घेतला. तपासणी नाक्यावर गुंतून राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना आवश्यक ड्युटी नेमून दिल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील १६ चेकपोस्ट सध्या बंद आहेत. भाट्ये, जयगड, चाफे, गणपतीपुळे, नाटे, रायपाटण, लांजा, ग्रामीण, गुहागर, दभोळ, लाटघर, पेढे आदी तपासणी नाक्यांचा समावेश आहे. यामुळे पोलिसदलाला आणखी ४० कर्मचारी उपलब्ध झाल्याने काहीसा कामाचा भार हलका झाला आहे; परंतु ही बंद केलेली चेकपोस्ट कायमची बंद करण्यात आलेली नाहीत. अचानक कधीही सुरू करण्यात येणार आहेत.
--
कोट
जिल्ह्यात पोलिसांचे मनुष्यबळ कमी आहे. त्यात तपासणी नाक्यामध्ये अनेक कर्मचारी गुंतून राहतात. त्यांना अन्य ठिकाणी वर्ग करण्यात आले आहे. हे १६ तपासणी नाके अचानक सुरू करून तपासणी केली जाणार आहे.
-धनंजय कुलकर्णी, जिल्हा पोलिस अधीक्षक