
खेडशी नाका परिसरात सापडले खवले मांजर
rat१५४१.txt
बातमी क्र. ४१ ( पान ३ साठी)
फोटो-
rat१५p२८.jpg-
८३०६७
रत्नागिरी - खेडशीत आढळलेले खवले मांजर
खेडशी नाका परिसरात खवले मांजर
वनविभागाने सोडले नैसर्गिक अधिवासात
रत्नागिरी, ता. १५ : शहराजवळील खेडशी नाका परिसरात सापडलेल्या खवले मांजराला वन विभागाने जीवदान दिले. आज सकाळी याबाबतची माहिती मिळताच वन विभागाने तासाभराl रेस्क्यु करून त्याला सुखरुप नैसर्गिक अधिवासात सोडले.
खेडशी येथील केतन साळवी यांनी खवले मांजरासंदर्भात दुरध्वनीवरून वन विभागाला माहिती दिली. त्या अनुषंगाने मानवी वस्तीत आलेल्या खवले मांजराची रेस्क्यु करण्यासाठी वनविभागाचे वन्य प्राणी बचाव पथकाने तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. खवले मांजरास वन विभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत सुरक्षीतरित्या ताब्यात घेवून खवले मांजराची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्याकडुन तपासणी केली. ते सुरक्षित असल्याची खात्री करून घेऊन नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. हे बचाव कार्य विभागीय वन अधिकारी दीपक खाडे , सहायक वन संरक्षक सचिन निलख, यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी परीक्षत्र वन अधिकारी प्रकाश सुतार, व त्यांचे सहकारी वनपाल पाली एन एस गावडे, वनरक्षक रत्नागिरी प्रभु सबणे व वनरक्षक श्रीमती शर्वरी कदम यांनी केले. वन्य प्राणी आढळल्यास तत्काळ माहिती देण्यासाठी टोल फ्री क्र १९२६ या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन प्रकाश सुतार यांनी केले.