
रत्नागिरी ः 80 टक्केहून अधिक शिक्षकांकडून तंत्रज्ञानाचा वापर
जिल्हा परिषद शिक्षणाचा धांडोळा--भाग ३--लोगो
फोटो ओळी
-rat१६p२.jpg- : KOP23L83125 तंत्रज्ञानाचा वापर करून शिकवताना शिक्षक.
--------
८० टक्यांहून अधिक शिक्षकांकडून तंत्रज्ञानाचा वापर
अवघड शिक्षण होतेय सुलभ; पीपीटीद्वारे विद्यार्थ्यांचा होतोय अभ्यास
राजेश कळंबटे ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १६ ः गेल्या काही वर्षात शिक्षणामध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. गुगल मीट, गुगल क्लासरूम, झूम अॅप, गुगल फॉर्म, व्हिडिओ, पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन या माध्यमातून अवघड शिक्षण विद्यार्थ्यांना सोपे होऊ लागले आहे. कोविड काळात जनजीवन ठप्प झाले आणि त्याबरोबरच शाळासुद्धा बंद झाल्या. विद्यार्थी घरातच होते. या परिस्थितीत ऑनलाईन शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली. आजही यांचा सर्वाधिक वापर होत आहे. दहा वर्षांपूर्वी शासनाने तंत्रस्नेही शिक्षकांची फौज निर्माण करण्यासाठी तालुकानिहाय प्रशिक्षणं घेतली होती. त्याचा फायदा कोविड कालावधीत झाला. गुगल मीट, गुगल क्लासरूम, झूम अॅप, गुगल फॉर्म, व्हिडिओ, पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन याचा वापर वाढला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे ८० टक्केहून अधिक शिक्षक तंत्राचा वापर शिक्षणातही करत आहेत.
विद्यार्थ्यांची आकलन क्षमता वाढवण्यासाठी चलतचित्रांचा नियमित अध्यापनात वापर करणे आवश्यक असल्याचे अभ्यासामधून पुढे आले. त्यासाठी शासनाने जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत तंत्रस्नेही शिक्षक तयार करण्याचा निर्णय घेतला होता. तालुकानिहाय प्रशिक्षणांचेही आयोजन केले गेले. जिल्ह्यातील साडेपाच हजारहून अधिक शिक्षक आहेत. त्यातील ५० टक्केहून अधिक शिक्षक हे तंत्रस्नेही आहेत. कोरोना काळात याचा सर्वाधिक फायदा विद्यार्थ्यांना झाला. शिक्षकांकडून युट्युबच्या माध्यमातून शिकवण्या सुरू केल्या आहेत. ऑनलाईन व्हिडिओची लिंक तयार करून ती व्हॉटस्अॅप, फेसबुकद्वारे विद्यार्थ्यांना शेअर करण्यात येत आहे. त्याचा मोफत उपयोग केला जात आहे. बोलक्या चित्रांबरोबर गाणी जोडली गेल्यामुळे मुलांचा प्रतिसाद वाढला आहे. आजही पॉवरप्रेझेंटेशनसाठी साहित्य प्रत्येक शाळेत उपलब्ध आहे. देणगी, लोकउठाव यातून संगणक खरेदीवरील भर अधिक आहे. जिल्ह्यात असलेल्या अडीच हजार शाळांपैकी बहुसंख्य ग्रामीण भागातील शाळात संगणक, लॅपटॉप यांचा वापर होत आहे.
संगमेश्वर तालुक्यातील वाडावेसराड या ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षक नारायण शिंदे यांनी इंटरॅक्टिव्ह पीपीटीद्वारे मुलांना मोफत शिक्षण देण्यास सुरवात केली आहे. यामध्ये संगीताची जोड दिली गेली होती तसेच लहान मुलांना आवडणाऱ्या कार्टूनचा समावेश असल्यामुळे त्याला प्रतिसादही मोठ्या प्रमाणात लाभला. एका स्वाध्यायावर क्लिक केले की, गाण्याच्या माध्यमातून तो विषय मांडला जाईल अशी रचना करण्यात आली होती. आजही या पीपीटीद्वारे अभ्यास करणाऱ्या मुलांचा टक्का वाढत आहे.
(समाप्त)
कोट
कोरोनातील परिस्थितीमुळे तंत्रज्ञानाचा नियमित शिक्षणातील वापर वाढला आहे. मुलांना शिकवणं सोप झालं असून, मुलंही आत्मसात करत आहेत.
- नारायण शिंदे, तंत्रस्नेही शिक्षक