साडवली-संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साडवली-संक्षिप्त
साडवली-संक्षिप्त

साडवली-संक्षिप्त

sakal_logo
By

rat१६२४.txt

बातमी क्र..२४ (पान २ साठी)

फोटो ओळी
rat१६p२९.jpg-
८३२२७
देवरूख ः त्या गटारातील गाळ उपसून साफसफाई करण्यात आली.
--

सावरकर चौकातील त्या गटारातील गाळ उपसला

साडवली, ता. १६ ः देवरूख सावरकर चौकाजवळील मूकबधिर इस्त्रीचालक मालक संजय श्रीधर जाधव यांच्या दुकानासमोरच शेजारील हॉटेलचे सांडपाणी उघड्यावर सोडण्यात येत होते. याबाबत निवेदन देवूनही नगरपंचायत दुर्लक्ष करत होती. त्यामुळे संजय जाधव आणि कुटुंबीयांना दुर्गंधीला सामोरे जावे लागत होते. याबाबत दै. ''सकाळ''ने वृत्त प्रसिद्ध करताच लगेच यंत्रणा हलली. नगरपंचायतीकडून गटारातील गाळ उपसण्यात आला असून साफसफाई करण्यात आली.
--

डीबीजे महाविद्यालयाला आयएसओ मानांकन

चिपळूण ः येथील नवकोकण एज्युकेशन सोसायटीच्या डीबीजे महाविद्यालयालयाने सन २०२१-२२मध्ये आयएसओ मानांकन प्राप्त केले. ते मानांकन पुढे चालू ठेवण्यासाठी सर्व्हिलन्स ऑडिट आवश्यक असते. नुकताच महाविद्यालयाचे तिसरे सर्व्हिलन्स ऑडिट पुणे येथील ऑडिट कमिटीने पूर्ण केले. त्या कमिटीचा अहवाल प्राप्त झाला असून, आयएसओ मानांकन पुढे चालू ठेवण्याची शिफारस करण्यात आली आहे. हे ऑडिटचे काम पूर्ण करण्यासाठी आयएसओ कमिटीप्रमुख डॉ. बी. एस. कांबळे, सदस्य डॉ. चेतन आठवले, डॉ. सुधीर मोरे, प्रा. स्नेहल कुलकर्णी, प्रा. कांचन तटकरे, प्रा. शुभांगी इंगळे, प्रा. मीता तांबे, डॉ. सुजाता खोत, प्रा. माधव ओक, प्रा. सई सुर्वे, विजय जाधव, दीपक पुनसकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
--

फोटो ओळी
-rat१६p१७.jpg ः
८३१५०
चिपळूण ः मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धेतील विजेते विद्यार्थी.
---
शिशुविहारमध्ये दासनवमी साजरी

चिपळूण ः परशुराम एज्युकेशन सोसायटी संचलित शिशुविहार विभागात दासनवमी साजरी करण्यात आली. या वेळी शिशुविहार विभागाच्या विभागप्रमुख मेधा पूजन, सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांसमवेत श्री रामदास स्वामी यांच्या प्रतिमेचे पूजन केले. दासनवमीनिमित्त रिना पाटेकर यांनी विद्यार्थ्यांना समर्थ रामदासांविषयी माहिती सांगितली. मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेचे परीक्षण स्नेहल दीक्षित व मेघना चितळे यांनी केले. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये लहान गट अनुक्रमे क्रमांक रौनक जाधव, स्वरा सावंत, मुद्रा शेवडे तसेच उत्तेजनार्थ रेणू रहाटे यांनी पटकवला. तसेच मोठ्या गटात प्रथम सुरभी शेंबेकर, द्वितीय अद्वैत खेडकर, तृतीय आभा पुरोहित, उत्तेजनार्थ गिरीजा गद्रे यांनी पटकवला. या विद्यार्थ्यांचे शाळेच्या विभागप्रमुख मेधा जोशी, स्पर्धाप्रमुख सीमा आठल्ये, परीक्षक स्नेहल दीक्षित, मेघना चितळे आणि शिक्षकवृंदानी कौतुक केले.
---

फोटो ओळी
-rat१६p१८.jpg ः
८३१५१
चिपळूण ः पेढे गवळवाडी येथे लागलेला वणवा विझवताना अग्निशमन विभागाचे कर्मचारी.
--
पेढे गवळवाडीत येथे वणवा

चिपळूण ः तालुक्यात वणवा लागण्याचे प्रकार सुरू आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर पेढे गवळवाडी येथे बुधवारी सायंकाळी वणवा लागला. चिपळूण पालिकेच्या अग्निशमन विभागाने हा वणवा विझवला. दोन दिवसांपूर्वी ओवळी, वालोटी आणि कळकवणे येथील माळरानावर वणवा लागला होता. त्यात पाणीयोजनेचे पाईप जळून खाक झाले. सुमारे ७ ते ८ लाखाचे नुकसान झाले. ही घटना ताजी असताना पेढे-परशुराम येथे रस्त्यालगतच्या झाडीला आग लागली. मोठा वणवा पेटल्यानंतर येथील ग्रामपंचायत सदस्या नूतन महाडिक यांनी चिपळूण पालिकेच्या अग्निशमन विभागाशी संपर्क करून पाण्याचा बंब मागवला आणि आग विझवली. पेढे गवळवाडी येथे रस्त्यावरच हा वणवा लागला. तो कसा लागला याची माहिती मिळाली नाही; मात्र वणव्यामुळे झाडांचे मोठे नुकसान झाले.
---
फोटो ओळी
-rat१६p२५.jpg
८३१८१
ः चिपळूण ः कार्यक्रमात सहभागी झालेले आजी-आजोबा.
-
खेर्डी मॉडेल शाळेत आजी-आजोबा दिवस

चिपळूण ः जिल्हा परिषदतर्फे मॉडेल स्कूल म्हणून राबवण्यात येणाऱ्या केंद्रीय शाळा खेर्डी नं. १ या शाळेत ''आजी आजोबा दिवस '' उत्साहात साजरा करण्यात आला. हा दिवस हा विद्यार्थ्यांसाठी आनंदोत्सव आणि आजी-आजोबांसाठी अनोखा दिवस. आजी-आजोबांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने आणि बालकांच्या मनात आजी-आजोबांबद्दल आदर निर्माण व्हावा म्हणून हा दिवस साजरा करण्यात आला.
मुख्याध्यापक दीपक यादव यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम घेण्यात आला. या वेळी मुलांनी उपस्थित आजी-आजोबांची आरती केली. पुष्प देऊन त्यांचे स्वागत केले. आजींसाठी संगीतखुर्ची, सागरगोटे, फुगड्या खेळ घेतले तर आजोबांसाठी विटीदांडू, क्रिकेटचे खेळ झाले. आजी -आजोबांना नातवंडांचे सांस्कृतिक कार्यक्रम दाखवण्यात आले. अल्पोपाहार देण्यात आला. त्यानंतर सर्व आजींसाठी मेहंदी काढण्याचा कार्यक्रम झाला. सर्वांना भेटवस्तू देण्यात आल्या. वैशाली जंगम या आजींनी मनोगत व्यक्त केले. प्राची शिरगावकर या आजीने छोट्या बालकांना सुंदर नृत्य सादर केलं त्यासाठी त्यांना २०१ रुपयांचे बक्षीस दिले. सोनू कुंभार या आजोबांनी २५० रुपयांचे बक्षीस दिले. कार्यक्रमास तन्वी कासार, वृषाली भुरण, शिक्षणतज्ञ दाभोळकर गुरूजी यांच्यासह शिक्षक परिवार उपस्थित होता.
--