नेतृत्त्व गुणांचा विकास करून समाजाला उच्च स्तरावर न्हावे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नेतृत्त्व गुणांचा विकास करून समाजाला उच्च स्तरावर न्हावे
नेतृत्त्व गुणांचा विकास करून समाजाला उच्च स्तरावर न्हावे

नेतृत्त्व गुणांचा विकास करून समाजाला उच्च स्तरावर न्हावे

sakal_logo
By

kan164.jpg
83230
कणकवलीः शिबिरातील सहभागीना मान्यवराच्या हस्ते प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.
...........
नेतृत्त्व गुणांचा विकास करून
समाजाला उच्च स्तरावर न्हावे
रमेश पवारः व्यक्तिमत्व विकास शिबिर समारोप
कणकवली, ता. १६ : युवकांमधील सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी अशी व्यक्तिमत्त्व विकास शिबिरे आवश्यक आहेत. आपल्यात नेतृत्त्व गुणांचा विकास करून समाजाला उच्च स्तरावर घेऊन जाण्यासाठी युवकांनी कार्यरत राहिले पाहिजे, असे आवाहन तहसीलदार रमेश पवार यांनी केले. नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग आणि यारा फाउंडेशन कणकवली यांच्यावतीने वागदे गोपुरी आश्रम येथे तीन दिवसीय निवासी युवा व्यक्तिमत्त्व विकास प्रशिक्षण शिबीर आयोजित केले होते. त्याच्या समारोप कार्यक्रमाला एपीआय सुप्रिया बंगडे, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी मोहितकुमार सैनी, वैदिक गणित प्रशिक्षक रुपाली कदम, जिल्हा व्यापारी संघाचे कणकवली अध्यक्ष दीपक बेलवलकर, सुगंधा देवरुखकर, यारा फाउंडेशनचे अध्यक्ष विश्वराज सावंत आदी उपस्थित होते.
युवकांनी आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करावे. समाजाप्रती असणारी आपली जबाबदारी ओळखून काम करावे, असे आवाहन बंगडे यांनी केले. पुढील भावी पिढी उद्योजकांची पिढी आहे. आपल्याला जे आवडतं तेच शिका. दुसऱ्यांच्या अपेक्षांच्या बोज्याखाली राहू नका, असे दीपक बेलवलकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. तर नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी मोहितकुमार सैनी यांनी नेहरू युवा केंद्राची माहिती देत युवा शक्ती सकारात्मक दिशेने वळविण्यासाठी नेहरू युवा केंद्राची भूमिका आवश्यक असल्याचे सांगितले. नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग आणि यारा फाउंडेशन कणकवली यांच्यावतीने गोपुरी आश्रमात जिल्हास्तरीय नेतृत्त्व विकास शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात चाळीसहून अधिक शिबिरार्थींनी सहभाग घेतला होता.