वेंगुर्लेत पाणबुडी आणणार

वेंगुर्लेत पाणबुडी आणणार

swt१६१९.jpg
८३२५१
वेंगुर्ले : येथील नवाबाग किनाऱ्यावरील झुलत्या पुलाचे लोकार्पण करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. सोबत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत आदी.

वेंगुर्लेत पाणबुडी आणणार
एकनाथ शिंदे ः कोकणात पर्यटनाला मोठा वाव
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. १६ः कोकण हे निसर्गरम्य ठिकाण असून या ठिकाणी पर्यटनाला मोठा वाव आहे. भारतातील पहिली पाणबुडी या ठिकाणी दीपक केसरकर यांच्या प्रयत्नातून आणणार आहोत. कोकणात, सिंधुदुर्गात येणारा पर्यटक कशाप्रकारे आकृष्ट होईल, यासाठी सोयीसुविधा देणे, इन्फ्रास्ट्रक्चर उभारणे यामध्ये सरकार पूर्णपणे सहभाग घेईल, अशी प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेंगुर्ले येथे केले.
येथील नवाबाग समुद्र किनाऱ्यावरील झुलता पूल व वेंगुर्ले शहर नळ पाणीपुरवठा योजना टप्पा क्रमांक २, निशाण धरणाची उंची २.५ मीटरने वाढविणे या कामांचे लोकार्पण मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अधीक्षक अभियंता छाया नाईक, कार्यकारी अभियंता अनामिका जाधव, उपविभागीय अभियंता संजय दहिफळे, वेंगुर्ले माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, बाळासाहेबांची शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, उभादांडा सरपंच नीलेश चमणकर, उमेश येरम उपस्थित होते. यावेळी ‘माझा वेंगुर्ला’तर्फे घेण्यात येणाऱ्या पतंग महोत्सवाचे उद्घाटनही मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com