
कणकवली :पुरस्कारासाठी
संत रोहिदासरत्न पुरस्कारासाठी आवाहन
कणकवली ः संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्था, मुंबई या सेवाभावी संस्थेच्या चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त संत रोहिदास महाराजांच्या नावे राज्यस्तरीय रोहिदासरत्न पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. चर्मकार समाजातील शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, कला-क्रीडा, सहकार, साहित्य आदी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना प्रतिवर्षी सात मानाचे पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या चर्मकार समाजातील व्यक्तींनीच आपल्या कामाचे प्रस्ताव २४ पर्यंत साद नारायण मसुरकर, सहाय्यक शिक्षक, माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग या पत्त्यावर पाठवावेत. आलेल्या प्रस्तावामधून पुरस्कार निवड समिती छाननी करून पुरस्कारप्राप्त नावे जाहीर होतील. पुरस्कारप्राप्त व्यक्तींना निवडपत्र पाठविले जाईल. पुरस्कार वितरण कार्यक्रम संस्थेच्या चतुर्थ वर्धापन दिनी पाच मार्चला मान्यवरांच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग येथे होईल.