आकेरी रामेश्वर रथोत्सव उद्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आकेरी रामेश्वर 
रथोत्सव उद्या
आकेरी रामेश्वर रथोत्सव उद्या

आकेरी रामेश्वर रथोत्सव उद्या

sakal_logo
By

83391
श्री देव रामेश्वर रथ

आकेरी रामेश्वर
रथोत्सव उद्या
कुडाळ ः आकेरी येथील प्रसिद्ध श्री देव रामेश्वर रथोत्सव रविवारी (ता. १९) होणार आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या उत्सवाला प्रतिवर्षी माघ दशमीला सुरवात होते. उद्या (ता. १८) महाशिवरात्रीनिमित्त पहाटे भाविकांकडून अभिषेक, नवस, गाऱ्हाणे, रात्री आडदशावतार आदी कार्यक्रम होणार आहेत. दर्श अमावस्येदिनी रविवारी (ता. १९) सकाळी भाविकांचे अभिषेक, गाऱ्हाणे, सायंकाळी पाचला गायन, भजन, रात्री पुराण पालखी व ‘श्रीं’ची रथातून सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर यक्षिणी दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. या उत्सवात माघ दशमीपासून रथोत्सवापर्यंत रोज पुराण, पालखी कार्यक्रम होणार आहे.
..............
कासार्डे तिठा येथे
तिरंगी भजन सामना
कणकवली ः स्वराज्य ट्रक चालक मालक संघटनेतर्फे संजय नकाशे मित्रपरिवार आयोजित तिरंगी भजनांचा सामना आयोजित केला आहे. शिवजयंतीनिमित्त रविवारी (ता.१९) सायंकाळी सातला हा कार्यक्रम होणार आहे. तिरंगी भजनाच्या सामन्यांमध्ये बुवा- विजय पाताडे, बुवा- संतोष मिराशी आणि बुवा- मंगेश खाडये हे सहभागी होणार आहेत. कासार्डे तिठा बाजारपेठ येथे सायंकाळी सातला तिरंगी भजनाचा सामना होणार आहे. यात सहभागी व्हावे, असे आवाहन संजय नकाशे यांनी केले आहे.
--
कडावलला आज
महाशिवरात्रोत्सव
कुडाळ ः कडावल येथील ग्रामदेवता लिंग रवळनाथ मंदिर येथे उद्या (ता. १८) महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन केले आहे. यानिमित्त सकाळी पूजाविधी, अभिषेक, वारकरी संप्रदायाचा हरिपाठ, स्थानिक भजने, रात्री ९ ला आमनेसामने डबलबारी भजनाचा सामना बुवा वैभव सावंत (सद्‌गुरू भजन मंडळ, कुडाळ) विरुद्ध बुवा सुजित परब (कोटेश्वर भजन मंडळ, हरकुळ बुद्रुक) यांच्यात रंगणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन देवस्थान मानकरी व ग्रामस्थांनी केले आहे.
--
वर्दे गावासाठी
विकास निविदा
कणकवली ः वर्दे (ता.कुडाळ) ग्रामपंचायतीतर्फे विकास निविदा जाहीर करण्यात आली. यामध्ये वर्दे मुख्य रस्ता ते लोखंडी साकवापर्यंत पायवाट काँक्रिटीकरणासाठी ९१ हजार ७६० रुपये निधी मंजूर झाला आहे. मठ मार्गे गावठण रस्ता दुरुस्ती ५९ हजार ७०७ रुपये निधी मंजूर आहे. वर्दे वरचीवाडी कुंभारवाडी नळ योजना दुरुस्तीसाठी एक लाख ५७ हजार रुपये निधी मंजूर आहे. या तीन्ही कामांसाठी ३१ मे २०२३ पर्यंत मुदत आहे. २३ फेब्रुवारी पर्यंत बंद लकोट्याद्वारे निविदा अर्ज करावेत. निविदा २४ फेब्रुवारी रोजी खुली होईल, असे ग्रामपंचायतीने कळविले आहे.