-पोलिस पाटीलांच्या रिक्त पदांसाबाबत उपजिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

-पोलिस पाटीलांच्या रिक्त पदांसाबाबत उपजिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा
-पोलिस पाटीलांच्या रिक्त पदांसाबाबत उपजिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा

-पोलिस पाटीलांच्या रिक्त पदांसाबाबत उपजिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा

sakal_logo
By

rat१७९.txt

(टुडे पान २ साठी)

पोलिस पाटील रिक्त पदांसाबाबत चर्चा

रत्नागिरी, ता. १७ ः पोलिस पाटील यांच्या रिक्त पदांसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलिस पाटील संघातर्फे जिल्हाध्यक्ष विश्वनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड यांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा करून मागण्यांचे निवेदन देण्यात आले. जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात जाऊन थकित प्रवासी भत्ता व मानधन याबाबत पाठपुरावा केला.
उपजिल्हाधिकारी गायकवाड यांनी सांगितले, पोलिस पाटील भरतीची प्रक्रिया चालू आहे. मे, जून महिन्यांपर्यंत ती भरती पूर्ण होईल. त्यामुळे पोलिस पाटील यांना कामकाज करणे सुलभ होईल. पोलिस पाटील यांच्या थकित प्रवासभत्त्याबाबत पोलिस अधीक्षक कार्यालयात भेट घेऊन २०१२ ते २०२२ पर्यत मंजूर झालेला प्रवास भत्ता मिळावा याबाबत चर्चा केली. त्यावर पोलिस पाटील यांचे प्रवासभत्ता बील अधीक्षक कार्यालयाकडून महिन्यातून एकवेळचे काढते, जशी मागणी पोलिस ठाण्यातून होईल त्या पद्धतीने काढले जाते. तुम्ही पाच दिवसांच्या कामाचा अहवाल पोलिस ठाण्याला द्या मग पाच दिवसाचे बील काढता येईल, असे सांगण्यात आले. बाणकोट येथील पोलिस पाटील यांचे २०२१ मधील एक महिन्याचे मानधन राहिले होते. त्याबद्दल चौकशी केली असता अधीक्षकांकडून ते बील काढण्यात आले आहे व त्याची चौकशीही लावली आहे, असे सांगितले. या वेळी जिल्हाध्यक्ष विश्वनाथ पाटील, जिल्हा सचिव नीलेश गुरव, संघटक जयवंत फडके, महिला संघटक प्रिया बंदरकर, तालुका समन्वय समिती अध्यक्ष अमेय वेल्हाळ, रत्नागिरी ग्रामीण विभाग अध्यक्ष शलाका सावंतदेसाई आदी उपस्थित होते.