संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

पान २ साठी, संक्षिप्त

‘आयसीएस’मध्ये एकदिवसीय कार्यशाळा
खेड ः येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या आयसीएस महाविद्यालयात नेहरू युवा केंद्र व महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळा झाली. प्र. प्राचार्या डॉ. अनिता आवटी यांनी प्रास्ताविक केले. कार्यशाळेतून ‘एनएसएस’मधील २०२१ चा राज्यस्तरीय व २०२१ चा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्राप्त केलेले डॉ. दिवेश गिन्नारे यांनी ‘एनसीसी’ व ‘एनएसएस’मधून कोणत्या प्रकारचे करिअर घडू शकते, याचे सविस्तर मार्गदर्शन केले. प्रा. आवटी यांनी विद्यार्थ्यांना ‘स्थलांतर’विषयक अद्ययावत माहिती या कार्यशाळेतून दिली. स्थलांतरविषयक विविध प्रश्न, समस्या त्यांनी अधोरेखित केल्या. रत्नागिरी सायबर क्राईमचे एपीआय पुरळकर यांनी सोशल मीडियाचा वाढता वापर व सायबर गुन्ह्याविषयीची विविध उदाहरणांसह माहिती विद्यार्थ्यांना दिली. गुजरात भूकंप, महाड महापूर, तळे येथील दरड घटना यांसारख्या आपत्तींमध्ये कार्य केलेले तसेच २०२३ मध्ये राष्ट्रपती पदकाने सन्मानित झालेले रायगड येथील काशीनाथ कुरकुटे यांनी विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनातील आपले अनुभव कथन केले.

आयसीएसमध्ये करिअर संधीवर मार्गदर्शन
खेड ः सहजीवन शिक्षण संस्थेच्या आयसीएस महाविद्यालयात ‘व्हिजन एविएशन अॅकॅडमी’तर्फे एविएशन आणि हॉस्पिटॅलिटीमधील करिअरच्या संधी यावर मार्गदर्शनपर कार्यक्रम झाला. व्हिजन एविएशन अॅकॅडमीचे ‘सीईओ’ डॉ. प्रशांत पवार यांनी विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील संधी समजावून सांगितल्या. कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. अनिता आवटी, वाणिज्य विभागप्रमुख डॉ. सी. आर. साळुंखे, वाणिज्य विभागाच्या प्रा. लीना चिखले, अर्थशास्त्र विभागाचे प्रा. रोहित कांबळे उपस्थित होते.

डी-कॅड आर्ट गॅलरीत चित्रांचे प्रदर्शन
साडवली ः डी-कॅड देवरूखचे वार्षिक स्नेहसंमेलन संकल्पन २०२३ हे १८ ते २६ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. या निमित्ताने विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले. आर्ट गॅलरीत हे प्रदर्शन सकाळी दहा ते सायंकाळी सातपर्यंत रसिकांना पाहता येणार आहे. या वर्षी स्थापत्यकला हा विषय घेऊन हे वार्षिक स्नेहसंमेलन होईल. कलारसिकांनी अवश्य भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक करावे, असे आवाहन कार्याध्यक्ष अजय पित्रे, प्राचार्य रणजित मराठे यांनी केले आहे.