महाआरोग्य शिबिरांतून समाजसेवा
83458
पांग्रड निरुखे ः महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन करताना डीन डॉ. डॉ. प्रकाश गुरव. शेजारी डॉ. महेश खलिपे, डॉ. संजय निगुडकर, आर. टी. मर्गज, विजय चव्हाण, डॉ. तायशेटे, संध्या तेरसे आदी. (छायाचित्र ः अजय सावंत)
महाआरोग्य शिबिरांतून समाजसेवा
डॉ. प्रकाश गुरव ः पांग्रड-निरुखेतील शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १८ ः महाआरोग्य शिबिर काळाची गरज आहे. अशा प्रकारचे शिबिर ग्रामीण भागात होणे हे निश्चितच कौतुकास्पद आहे. महाआरोग्य शिबिरातून लोकांची काळजी घेतली जाते, ही मोठी समाजसेवा आहे. सर्वांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामुळे येथील रुग्णांना चांगल्या प्रकारे सेवा देता येणार आहे. भविष्यात वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने जिल्ह्यात अशा प्रकारे आरोग्य शिबिरे आयोजित केली जातील, असे प्रतिपादन वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. प्रकाश गुरव यांनी आज पांग्रड-निरुखे येथे महाआरोग्य शिबिरात केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील राज्यातील पहिला पांग्रड-निरुखे गाव ई-हेल्थ कार्डधारक ठरला आहे. दुपारच्या सत्रात सुमारे १३०० हुन अधिकांनी या भव्य शिबिराचा लाभ घेतला. पंचायत समिती कुडाळ, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, पांग्रड-निरुखे ग्रामपंचायत यांच्यावतीने आणि बॅ. नाथ पै शिक्षण संस्था कुडाळ, एन. व्ही. कुलकर्णी विद्यामंदिर पांग्रड-निरुखे व पांग्रड-निरुखे ग्रामस्थ यांच्या सहकार्याने आपला गाव, पंचक्रोशी, दशक्रोशीच्या सुदृढतेसाठी जिल्ह्यात प्रथमच अनेक दुर्धर व्याधींवरील तपासण्या, निदान व उपचारांची सोय असलेले आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या सर्व सेवा एकाच शिबिरात मोफत उपलब्ध असणारे आणि सर्व महत्त्वाची उपकरणे, साधने व सुविधांनी सुसज्ज असे महाआरोग्य शिबिर आज एन. व्ही. कुलकर्णी विद्यामंदिर, पांग्रड येथे पार पडले. शिबिराचे उद्घाटन डीन डॉ. गुरव यांच्या हस्ते झाले. यावेळी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. संजय निगुडकर, डॉ. विद्याधर तायशेटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिफे, माध्यमिक शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख, बॅ. नाथ पै शिक्षण संस्था चेअरमन उमेश गाळवणकर, डॉ. देविदास चव्हाण, डॉ. शरण चव्हाण, डॉ. संजीव आकेरकर, डॉ. वर्षा रोकडे-चव्हाण, डॉ. पी. डी. वजराटकर, डॉ. लिहितकर, डॉ. प्रशांत कोलते, डॉ. जुईली, डॉ. आनंद फड, जनरल मेडिसिन, डॉ. बिजेंद्र तोडावे (डेरवण), डॉ. अभिजीत त्रिपाठी (डेरवण), स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. ओंकार वेदक, डॉ. सूरज शुक्ला, डॉ. समीर मर्गज, डॉ. राजेश सावंत, डॉ. हर्षदा माळवदे, राजेंद्र केळकर आदी ४० हुन अधिक डॉक्टर तसेच निमंत्रक, प्रशासक गटविकास अधिकारी (उच्चस्तर वर्ग १) विजय चव्हाण (पंचायत समिती कुडाळ), डॉ. संदेश कांबळे, संस्था चेअरमन आर. टी. मर्गज, पांग्रड सरपंच कावेरी चव्हाण, निरुखे सरपंच कीर्तीकुमार तेरसे, उमेश गाळवणकर, कुडाळ नगरसेविका संध्या तेरसे, प्रा. अरुण मर्गज, उपसरपंच महानंदा मेस्त्री, रामकृष्ण तेरसे, सामाजिक कार्यकर्ते के. टी. चव्हाण, रघुनाथ चव्हाण, औदुंबर मर्गज, प्रकाश तेंडोलकर आदी उपस्थित होते. मुश्ताक शेख यांनी आपले शरीर हेच शेवटपर्यंत साथ देते. त्यामुळे शरीराची काळजी घेणे गरजेचे आहे, असे सांगितले. डॉ निगुडकर यांनी या गावचा पुत्र या नात्याने येथील रुग्णांना सेवा देणे कर्तव्य असून गटविकास अधिकारी विजय चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी उत्कृष्ट नियोजन केले, असे सांगितले. सूत्रसंचालन प्रकाश तेंडोलकर यांनी केले.
...............
चौकट
पांग्रड-निरुखेला राज्यात पहिले ‘ई-हेल्थ’ कार्ड
पांग्रड-निरुखे गाव महाराष्ट्रातील पहिले ई-हेल्थ उपकेंद्र करण्याचा मानस होता, तो आज यशस्वी झाला. सर्व प्रकारच्या रुग्णांची तपासणी, रोगनिदान व तातडीचे उपचार या ठिकाणी करण्यात आले. डेरवण येथील वालावलकर कॅन्सर हॉस्पिटलच्या पथकाद्वारे सर्व प्रकारच्या कॅन्सर रुग्णांची तपासणी, निदान व उपचार तसेच भविष्यकालीन सेवांचा मानस आहे. बॅ. नाथ पै नर्सिंग व फिजिओथेरपी विंगद्वारे प्रात्यक्षिक व उपचार, कान, नाक, घसा विकाराच्या सर्व तपासण्या, निदान व उपचार, दंतरोग, स्त्रीरोग सर्व प्रकारचे त्वचारोग, मानसिक आरोग्य तपासणी, निदान, उपचार व मार्गदर्शन या शिबिरात करण्यात आले, अशी माहिती गटविकास अधिकारी चव्हाण यांनी दिली.
................
चौकट
मार्चमध्ये तीन महाआरोग्य शिबिरे
यावेळी डॉ. खलिफे यांनी गटविकास अधिकारी चव्हाण यांच्या महाआरोग्य शिबिर नियोजनाचे कौतुक केले. अशाच प्रकारची आणखी तीन महाआरोग्य शिबिरे जिल्ह्यात मार्च महिन्यात आयोजित केली जातील, असे त्यांनी यावेळी जाहीर केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.