
खेड ःउगवतीचा तारा योगेशदादा
rat१७३१.txt
बातमी क्र..३१ (टुडे पान २ साठी लेख)
फोटो ओळी
- rat१७p२५.jpg ः
८३४४९
खेड येथे नुकत्याच झालेल्या जेसीच्या मेळाव्याप्रसंगी स्थानिक व्यापाऱ्यांकडून विविध वस्तूंची खरेदी करताना
- rat१७p२६.jpg ः
८३४५०
खेड येथील तालुकास्तरीय हिवाळी स्पर्धेच्याप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांसोबत एका क्षणी आमदार योगेश कदम.
- rat१७p२७.jpg ः
८३४५१
दापोली येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी कार्यकर्त्यांना संबोधित करताना आमदार योगेश कदम.
- rat१७p२८.jpg ः
८३४५२
खेड शहरात पुरामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करत आमदार योगेश कदम यांनी व्यापारी संघटनेकडून त्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या त्या वेळी व्यापारी असोसिएशनचे सचिन करवा, प्रमोदभाई बुटाला सोबत अन्य व्यापारी बंधू.
- rat१७p३०.jpg ः
८३४५४
पंढरपूर येथे कार्तिकी एकादशीनिमित्त वारकरीबंधूंशी हितगुज साधताना आमदार योगेश कदम सोबत जिल्हा परिषदेचे माजी सभापती चंद्रकांत कदम व मान्यवर.
--
तरुणाईचा विधायक जोश, सक्षम, चैतन्य, क्रियाशील, धडाडी यांचा संगम अन् माजी पर्यावरणमंत्री रामदासभाई कदम यांचे सुपुत्र योगेशदादा कदम यांनी वडिलांकडून आशीर्वाद व संस्काराची शिदोरी घेत माध्यमातून राजकारणात ’एन्ट्री’ घेतली. खेड-दापोली- मंडणगड मतदार संघात अनेक विकासकामांसाठी, लोकांशी संवाद साधण्यासाठी सतत दौरे करत विकासकामांचा पाया रचताना अजोड संघटन कौशल्य निर्माण करत तमाम जनतेच्या हृदयात अढळस्थान मिळवले आहे. ते फक्त नावानेच ‘दादा’ नाहीत तर विकासकामांतही ‘दादा’ आहेत. अत्यंत कुशल संघटक, सौजन्यशील, संयमी नेतृत्व, रात्रंदिवस धडपडण्याची तयारी व युवकांना प्रेरक कर्तबगारी देत तरुणाईची मनगटे चेतवण्याची धमकही त्यांच्यात आहे. प्रत्येक जबाबदारीला पूर्ण न्याय देत कुशल नेतृत्व व कार्यक्षमतेच्या बळावर राजकारणात स्वतःचा प्रभाव निर्माण करणारे विशाल दूरदृष्टीचे अन् विकासातून बोलणारे प्रगल्भ नेतृत्व युवानेते योगेशदादा कदम यांच्या १८ फेब्रुवारीला वाढदिवस अभिष्टचिंतनानिमित्ताने...
-दिनेश शर्मा, उद्योजक, लोटे
--
उगवतीचा तारा योगेशदादा
योगेशदादा कदम यांनी रामदासभाईंकडून राजकारणापेक्षा समाजकारणाचे धडे गिरवत समाजकार्याला वाहून घेण्यासाठी शिवधनुष्य हाती घेतले. क्रीडाक्षेत्राची विशेष आवड असलेले दादा शिक्षण सुरू असतानाच ३ वर्षे चंद्रकांतदादा पंडित यांच्या क्रिकेट संघातही खेळले. क्रिकेट संघातील बारकाव्यांसह चौकार, षट्कार मारण्याचे कसब आत्मसात केले. त्याच कौशल्याचा वापर राजकारणातही खेड, दापोली, मंडणगडचा विकास करताना विकासाच्या बाबतीतही चौकार, षट्कार ठोकत आहेत. केवळ विकासाची दूरदृष्टी डोळ्यासमोर ठेवून पायाला भिंगरी लावल्यागत तीनही तालुके पिंजून काढत आहेत. ''निश्चयाचा महामेरू, बहुत जणांचा आधारू’ या उक्तीशी तंतोतंत जुळणारे आणि त्याची ज्वलंतपणे साक्ष पटवणारे असेच त्यांचे व्यक्तिमत्व आहे. विकासाभिमुख राजकारण करताना आपल्या मुल्यांची जपणूक करणारे व सर्वांनाच एक भक्कम आधार वाटणारे असे खंबीर नेतृत्व. केवळ राजकारणाच्या चौकटीत अडकून न राहता त्याहीपलिकडे जाऊन जनतेच्या मनामध्ये वेगळे अस्तित्व त्यांनी निर्माण केले आहे. सतत हसतमुख चेहरा व कोणतेही विकासकाम धडाक्यात करण्याची वृत्ती हे त्यांचे खास वैशिष्ट्य. कुठलेही काम तडीस नेण्याची त्यांची हातोटी वाखाणण्याजोगी आहे. आपल्या निर्भिड विचाराने युवकांमध्ये अस्मिता व स्वाभिमान जागृत करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. राजकारणाच्या माध्यमातून समाजाची निःस्वार्थपणे व मनोभावे सेवा करणे हा त्यांचा स्थायीभाव झाला आहे. सामान्यातील सामान्य माणसांचे वैयक्तिक अथवा सामाजिक प्रश्न सोडवण्याकडेही त्यांचा ओढा आहे. वडिलांची पुण्याई पाठीशी असली तरी स्वतःचे वेगळेपणही त्यांनी योजकतेने जपले आहे. याचमुळे दिवसेंदिवस त्यांचे नेतृत्व बहरत चालले आहे.
संघर्षाचे, तरुण कार्यकर्त्यांच्या गर्दीचे व जनसेवेचे परिमाणही जोडल्यामुळे नव्याने राजकारणात येऊ पाहणाऱ्या नवोदित युवकांसह सर्वसामान्यांसाठी ते हक्कांचे आशास्थान बनले आहेत. गेल्या तीन वर्षात सेनेच्या माध्यमातून खेड, दापोली, मंडणगड तालुक्यात कोट्यवधी रुपयांचा निधी आणून विकासकामांची गंगा वाहती केली आहे. याचमुळे लोकांचे प्रेम, विश्वास, बांधिलकी व निष्ठा या बळावर त्यांचा विकासरूपी अश्वमेध वेगाने दौडत आहे. त्यांच्याकडे गेलेला अन्यायग्रस्त, संकटग्रस्त, पीडित मदत न मिळता विन्मुख गेला असे आजवर कधीही झालेले नाही. याचमुळे ते सर्वसामान्यांचे ’दादा’ बनले आहेत. माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या माध्यमातून दापोली विधानसभा मतदार संघात विकासकामांचा अक्षरश: झंझावात सुरू केला आहे. तळागाळापर्यंत पोहचून जनतेच्या समस्यांशी समरस होत त्या सोडवण्यासाठी सत्वरतेने प्रयत्न करण्याच्या त्यांच्या हातोटीमुळे प्रत्येक गावातील आबालवृद्धांना ते आपले पाठीराखे वाटतात. विकासकामांची अलौकिक दूरदृष्टी व सखोल ज्ञान ही सूक्ष्म निरीक्षणशक्तीही त्यांच्या ठायी ठायी भिनली आहे. स्वभावात समयसूचकता असल्याने कोणत्याही आव्हानांना पेलण्यासाठी ते सदैव पुढे असतात. खेड, दापोली, मंडणगड तालुक्यातील विकासासाठी दौऱ्यांवर दौरे करत कार्यकर्त्यांशी संवाद साधत सेनेतील विस्कळीतपणा दूर करण्याची मौलिक कामगिरीही बजावली आहे. सेनेतील अंतर्गत धुसफुशीला कंटाळून असंख्य कार्यकर्ते अन्यत्र विखुरले होते. या कार्यकर्त्यांना एकसंघ करत पुन्हा शिवसेनेच्या मुख्य प्रवाहात आणण्याची अलौकिक किमयादेखील केली आहे. याचमुळे कार्यकर्त्यांची अफाट फौज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. त्यांच्या यशस्वीतेचा सलगपणा व सातत्य त्यांच्या विचारात आणि आचारातही आहे. कोणतेही सामाजिक आणि राजकीय कार्यात ’जिंकू शकतो, नव्हे जिंकणारच’ असा ठाम विश्वासही त्यांना आहे. प्रेरणा अन् आदर्श ठरलेले योगेशदादा ज्वलंत युवाशक्तीचे स्रोत आहेत. आताच्या युवाशक्तीसाठी त्यांच्या बोलण्यामध्ये अन् भाषणांमध्ये अभ्यासपूर्णता व नावीन्याचा समावेश दिसून येता. आजवरच्या वाटचालीत हात पुढे केला आहे. समाजकारण म्हणून अनेक गरजूंना त्यानी मदत केली आहे. केवळ राजकारण म्हणून न पाहता जनसेवेची संधी म्हणून ते पाहत आहेत. आपल्या कामातून जनतेचा लाभ कसा होईल याचाच ते सर्वतोपरी विचार करतात. याचमुळे ते सर्वसामान्यांचे हक्काचे ’दादा’ बनले आहेत. त्यांच्या ध्येयबोलीतून व्यक्त होणारी विनम्रता साऱ्यांनाच भावते. याचमुळे ते तमाम युवकांचे प्रेरणास्थान अन् आशास्थान बनले आहेत. माजी पर्यावरणमंत्री रामदासभाई कदम यांच्या विचारांच्या शृंखलेतून आकाशाला गवसणी घालण्याचा ते प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. स्पष्ट व पारदर्शी कर्तृत्वाने त्यांचा राजकीय अश्वमेध तितक्याच वेगाने उधळत आहे व भविष्यात त्यांना मोठी जबाबदारी पेलण्यासाठी अन् नव्या स्वप्नांसह इच्छा, आकांक्षांना उंच-उंच भरारी घेण्यासाठी परमेश्वराने शक्ती प्रदान करो हीच वाढदिनी सदिच्छा !!!
(पुरवणी संकलन म्हणून चंद्रशेखर जोशी)
--