हिरण्यकेशी तीर्थक्षेत्री आज महाशिवरात्रोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हिरण्यकेशी तीर्थक्षेत्री
आज महाशिवरात्रोत्सव
हिरण्यकेशी तीर्थक्षेत्री आज महाशिवरात्रोत्सव

हिरण्यकेशी तीर्थक्षेत्री आज महाशिवरात्रोत्सव

sakal_logo
By

83477
हिरण्यकेशी ः येथील गंगादेवी मूर्ती.

हिरण्यकेशी तीर्थक्षेत्री
आज महाशिवरात्रोत्सव
आंबोली, ता. १७ : येथील हिरण्यकेशी तीर्थक्षेत्रावर महाशिवरात्रीनिमित्त येणाऱ्या भाविकांसाठी आंबोली ग्रामस्थांनी तयारी केली आहे. विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. आंबोली हिरण्यकेशी हे जागृत तीर्थस्थान आहे. या ठिकाणी हिरण्यकेशी नदीचा उगम सातव्या गुहेत असून शिवलिंग आणि गंगादेवीची आणि श्री गणेशाची मूर्ती आहे. हे प्राचीन देवस्थान आहे. या ठिकाणी जलकुंड असून त्यात स्नान केले जाते.
हे स्थान काशी क्षेत्राप्रमाणे असल्याने या ठिकाणी अस्थी विसर्जन देखील केले जाते. शिव महिमा असल्याने शिवस्थान म्हणून भाविक मोठ्या श्रद्धेने येतात. महाशिवरात्रीनिमित्त यावर्षी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन गावकऱ्यांनी केले आहे. पहाटे ५ वाजता आरती, त्यानंतर भाविकांचे नारळ, ओटी ठेवणे, नवस फेडणे, गाऱ्हाणी असा कार्यक्रम होणार आहे. रात्री भजन कीर्तनाचा कार्यक्रम, दुसऱ्या दिवशी सकाळी नैवेद्य, देवस्नान आदी कार्यक्रम होणार असून त्याचे चोख नियोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी महामंडळाच्या तीन बसेस आंबोली बस स्थानकातून सोडण्यात येणार आहेत, अशी माहिती आगार व्यवस्थापक बिपीन प्रभू यांनी दिली. मुख्यालय कंट्रोलवरून पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. सावंतवाडी पोलिसांनी पाहणी करून बंदोबस्त मागितला आहे. खासगी गाड्या आणि रिक्षा व्यावसायिक सज्ज झाले असून यावर्षी मोठी गर्दी होण्याचा अंदाज आहे.