दाभोळ-क्राईम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दाभोळ-क्राईम
दाभोळ-क्राईम

दाभोळ-क्राईम

sakal_logo
By

कळकीत चिऱ्याच्या खाणीवरून केबलची चोरी
दाभोळ ः दापोली तालुक्यातील कळकी शिगवणवाडी येथील एका जांभ्या चिऱ्याच्या खाणीवरून ४५० मिटर लांबीची इलेक्ट्रिक केबल अज्ञाताने चोरून नेल्याची घटना घडली आहे. तालुक्यातील विनोद गोंधळेकर, सचिन डोंगरकर, पांडुरंग बांद्रे, नितीन जाधव तर कळकी शिगवणवाडी येथील अजित अनंत करबेले यांच्या चिरेखाणीवरून ४५० मिटर लांबीची केबल चोरीला गेल्याची ही तालुक्यातील २५ दिवसातील पाचवी घटना घडली आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य असलेल्या अनंत करबेले यांच्या मुलाच्या नावे परवाना असलेल्या कळकी शिगवणवाडी येथील जांभा चिरेखाणीवरून ४५० मिटर लांबीची आणि ६५ हजार रुपये किंमतीची तांब्याच्या धातूची वायर चोरीला गेल्याने याबाबतची अनंत सखाराम करबेले यांनी केबल चोरीची फिर्याद दाभोळ सागरी पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.

धाऊलवल्लीत दुचाकी अपघातात तरुण ठार
राजापूर : तालुक्यातील सागरी महामार्गावर धाऊलवल्ली येथे झालेल्या दुचाकी अपघातामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला. दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. उबेद बाग (२१, रा. साखरीनाटे) असे मृत तरुणाचे नाव असून गुरुवारी (ता. १६) सायंकाळी हा अपघात झाला.
नाटे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साखरीनाटे येथील उबेद बाग हा दोन साथीदारांसह दुचाकीने साखरीनाटेतून रत्नागिरी येथे जाण्यासाठी निघाले होते. रात्री उशिरापर्यंत त्यांनी कोणताही संपर्क न केल्याने रात्री साडेअकराच्या सुमारास नातेवाईकांनी संबंधित तरुणांना मोबाईलवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा फोन बंद येत होता. त्यामुळे घरच्या लोकांनी शोधाशोध केली असता रात्री अडीचच्या सुमारास धाउलवल्ली फाटा येथे एका वळणावर हे युवक रस्त्याच्या कडेला गंभीर जखमी अवस्थेत आढळून आले. यातील उबेद बाग हा जागीच मृत झाला होता तर अन्य दोघे गंभीर जखमी होते. दोघांना तत्काळ रत्नागिरी येथे हलविण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान मोटर सायकलस्वारावर गुन्हा नोंद करण्यात आला असून सहायक पोलिस निरीक्षक आबासो पाटील अधिक तपास करत आहेत.